यवतमाळ | प्लास्टिक मांज्याने चिरला चिमुकल्याचा गळा

प्रतिनिधी – श्रीकांत खोब्रागडे, यवतमाळ

सध्या चायनिज मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याची विक्री होत आहे. हे मांजे मात्र दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी नागपुर रोड ते बँक चौक रस्त्यावर एका मांज्यामुळे ५ वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला गेला. जैन रफिक मवाल असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकीचालकांच्या सावधानतेने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली असून गंभिर दुखापत झाली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

रविवार अन् दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने जैन हा आपला काका वसिम मवाल यांच्या सोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्यमध्ये जातं होता. दरम्यान नागपुर रोड वरून स्टेट बँक चौकाकडे जात असताना गणेश चौकात नायलॉनचा मांजा कुठून तरी उडून या दुचाकीवर आला आणि समोर बसलेल्या जैंनच्या गळ्याला अडकला. गाडीचा वेग मध्यम असल्याने मांजा समोरून गळ्याला अडकला. त्यामुळे यात जैनचां गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले गेले. ही बाब वसिम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी जाग्यावर थांबवली आणि जखमेची पाहणी केली. जखम खोल आणि त्यातून होणारा रक्तस्त्राव अधिक असल्याचे लगेच शहरांतील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य पाहता त्याचे ऑपरेशन करावे लागेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार काल रात्री उशिरा जैन वर शस्त्रक्रिया पार पडली.

खरंतर गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांज्यावर बंदी आहे. वन विभागाला असे मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने सर्रास दुकानांवर हे मांजे विक्रीला आहेत. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजे विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. सदर घटनेचे गांभीर्य पाहता संबधित विभागाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *