..विधानसभा बरखास्त करा; आणि माझ्या मुलाला मुख्यमंत्री करा.. विष्णू गदळे

बीड : महाराष्ट्र राज्यातील घटनात्मक पेच प्रसंग पाहता विधानसभा बरखास्त करावी असे श्री. विष्णू कुंडलिक गदळे रा. दहिफळ (वड) ता. केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून. माझा मुलगा श्रीकांत गदळे (किसान पुत्र) गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील विविध प्रश्नावर सातत्याने निस्वार्थपणे काम करत आहे. त्यामध्ये गरीबी हटाव व शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावे हा संकल्प हाती घेऊ राज्यातील जनतेच्या भल्यासाठी सातत्याने काम करत आहे. आज जर आपण पाहिलं तर माझा मुलगा श्रीकांत गदळे (किसान पुत्र) हा महाराष्ट्र राज्या तील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत असताना पहावयास मिळतआहे.सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या मुलाला श्रीकांतला महाराष्ट्र राज्य चा मुख्यमंत्री पदी नियुक्ती करावी असे राज्यातील 288 आमदारांपैकी बहुतांशी आमदारांची देखील इच्छा सह सर्वसामान्य जनतेतून सुद्धा मागणी होऊ लागली आहे. सध्याच्या घडीला राज्यात घडणाऱ्या घटना त्यापासून सर्वसामान्यांना होणारा त्रास व घटनात्मक पेच प्रसंग पाहता मा.राज्यपाल महोदय साहेबांनी विधानसभा बरखास्त करून माझ्या मुलाला श्रीकांत गदळे ला महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब वंचित घटकातील लोकांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री या पदावर नियुक्ती देऊन काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी विष्णू गदळे यांनी मा. राज्यपाल महोदय. यांच्याकडे मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत निवेदन देऊन केली आहे. आणि आपण नक्कीच माझ्या मुलाला श्रीकांत ला संधी द्याल ही आशा बाळगतो असे श्री.विष्णू गदळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *