दर्यापूर | निवेदन स्वीकारण्यास उपविभागीय अधिकारी यांनी नाकार दिल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या खाली खुर्चीला कापूस व निवेदन देऊन निषेध

धनराज खर्चान, प्रतिनिधी, भातकुली

शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष कार्यकर्ते व काही शेतकरी बांधव गेले असता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे ऑफिस कार्यालयात हजर असून सुद्धा त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला एक तासाच्या नंतर बाहेरून आल्यावर निवेदन स्वीकारू तोपर्यंत तुम्ही कार्याला थांबा असे उपविभागीय अधिकारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना म्हटले त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये खाली खुर्चीला निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी यांचा निषेध केला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले,तालुका अध्यक्ष राजेश पावडे, शहर अध्यक्ष रवी नवलकर, आकाश नारे, सुभाष बुरघाटे, अनिकेत सुरपाटणे, आकाश नारोळकर, विठ्ठल राऊत, तेजस तांबले, शिवा धर्माळे आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *