विचारांच्या संवादातून समाजाची जडण घडण अधिक प्रगल्भ होईल – आ. सौ. सुलभाताई खोडके

  • माळी समाजाचा ११ वा वर-वधू परिचय मेळावा थाटात
  • सगाई मंगलम परिचय पुस्तकाचे विमोचन व वितरण

अमरावती २४ डिसेंबर : अमरावती मधील माळी समाजातील उत्साही,कार्यक्षम,समाजाची तळमळ असणारे, समाजहित जोपासणारे समाज बांधव ,माळी समाजाचे वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहेत, ही समाजाकरिता गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे. आजच्या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअर, नोकरी व व्यवसायात व्यस्त आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे समाजात सर्वस्तरावर सखोल परिचय होणे शक्य होत नाही. आजच्या काळात वधू-वर परिचय मेळावा घेणे ही काळाची गरज आहे. अशा मेळाव्यांमुळे राज्यातील व सर्व जिल्ह्यातील जास्तीतजास्त वधू-वरांची माहिती एकत्रितपणे व एकाच मंचावर, एकाच ठिकाणी प्रत्यक्ष मिळते. त्यामुळे माळी समाज बांधवांचा वेळ,पैसा व श्रम वाचून कठीण कार्य सहजतेने होण्यास मदत होत आहे.महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, अमरावती च्या वतीने या मेळाव्याच्या आयोजनाकरिता पूर्व नियोजनापासून तर प्रत्यक्ष अंमलबजावणी पर्यंत केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजाला एकत्रित आणून विचारांच्या संवादातून समाजाची जडण घडण अधिक प्रगल्भ होणार असल्याने निश्चितच हे समाजाच्या शैक्षणीक, सांस्कृतिक व सामाजिक विकासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले.
महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, अमरावती माळी समाज संघटना द्वारे रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी शेगाव नाका परिसर समीपस्थ अभियंता भवन येथे आयोजित ११ व्या माळी समाज वधू -वर परिचय मेळावा कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून एस. बी. आय. चे सेवानिवृत्त अधिकारी रमेशपंत काटोलकर उपस्थित होते. तर उदघाटक म्हणून बांधकाम व्यावसायिक-अभिजित बोबडे उपस्थित होते. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनोहरराव आंडे, संजयराव आकोलकर, प्रमोदराव घालणी, दिनेशराव देशमुख, डॉ. प्रकाशराव कनेर, सौ. राजश्री जठाळे, योगेशराव पवार,प्रकाशराव भुस्कडे, शिवलाल ढाकुलकर, सचिन वानखडे, अशोकराव तायडे (पाटील) आदी उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अतिथींच्या हस्ते वंदन-पूजन-माल्यार्पण तसेच दीप प्रजवलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी अतिथी मान्यवरांचे हस्ते सगाई मंगलम नामक उपवर-वधू यांच्या परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था व समस्त आयोजन समितीच्या वतीने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल. श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच सर्व अतिथींचे सुद्धा यथोचित स्वागत करण्यात आले. यादरम्यान विवाह इच्छुक युवक-युवतींनी आपल्या भावी जोडीदाराला घेऊन असलेल्या अपेक्षा व्यक्त करीत उपस्थितांसमक्ष स्वतःचा परिचय करून दिला. यासोबतच व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचे वतीने उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित -आमंत्रित सदस्यांना सगाई मंगलम पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रा. वैशाली नागापूरे यांनी तर प्रास्ताविक-श्रीकांत साखरकर यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे विशाखा येवतकर यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी ऍड. विनोद नागापुरे, सौ. वंदनाताई वानखडे, प्रा. वैशाली नागापुरे, उषा वैराळे, मीना ढाकुलकर, डॉ. प्रकाश कनेर, दीपक वैराळे, प्रा. रवींद्र देशमुख, जनार्दन बोळे, मनोज नागापुरे आदींसह महारुद्र सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, अमरावती-माळी समाज संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच विवाह इच्छुक युवक-युवती तथा पालक व आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *