तालुकास्तरीय वक्तृत्व शारदा विद्या मंदिर शाळेचे स्पर्धेत यश

गोकुळ कोळी, प्रतिनिधी, यावल

यावल येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यावल तालुकास्तरीय तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात शारदा विद्या मंदिर साकळी येथील मनोहर वासुदेव बडगुजर १० वी अ या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय व्यसनमुक्ती या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले सदर विद्यार्थ्यास या परीक्षेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल मनोहर चे विद्यालयाचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्व संचालक मंडळ, साकळी येथील प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन , विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन पर्यवेक्षक एस जे पवार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले तसेच यावेळी साकळी येथील प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन यांनी या विद्यार्थ्यास त्यांच्याकडून दोनशे रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *