समान अधिकारांची अधोरेखा राज्यघटनेतील कलमोकलमी आहे – आमदार सौ. सुलभाताई खोडके

  • ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावतीकरांना दिल्या शुभेच्छा
  • जनसंपर्क कार्यालयात गणराज्य दिन सोहळा उत्साहात साजरा
  • सदैव सर्वांचे सर्वांसाठी अशा भारतीय प्रजासत्ताक दिनी भारत माता की जय चा उपस्थितांनी केला जयघोष

अमरावती २६ जानेवारी :- भारतीय प्रजासत्ताक आज आपल्या प्रवासाची ७४ वर्षे पुरी करून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची पहाट झाली आणि भारतीय राज्य घटना तयार करण्याचा जगाला आदर्श ठरावा असा उद्यम पुरा होऊन २६ जानेवारी १९५० रोजी खऱ्या अर्थाने भारतीय प्रजासत्ताक जन्माला आले. प्रजा-सत्ताक या शब्दातच भारतीय नागरिकांच्या सर्वोच्च अधिकारांचे सूचन आहे. प्रजेची, आपल्या सर्वांची समान सत्ता असणारे हे राज्य आहे.सर्वांना अधिकारही समान आहेत. भारताच्या घटनाकारांनी या स्वतंत्र देशाची संकल्पना केवळ लोकशाहीच्या राज्यव्यवस्थेने चालणारे नवजात राष्ट्र इतकीच केलेली नाही. लोकशाही हे प्रधान अंग आहेच. मात्र, प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या सामाजिक न्यायाची, विकासाच्या संधीची आणि सर्वतोपरी समान अधिकारांची अधोरेखा राज्यघटनेतील कलमोलमी आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनी उपस्थितांना संबोधून केले. अमरावती रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक मार्ग परिसर स्थित जनसंपर्क कार्यालयात आयोजित २६ जानेवारी भारतीय गणतंत्र दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या. संपूर्ण देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच शृंखलेत आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सामूहिक मानवंदना देण्यात आली. तद्नंतर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी राष्ट्रध्वज तिरंगाला सलामी देत यावेळी राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तद्नंतर जन गण मन अधिनायक जय हे या राष्ट्रगीताचे सामूहिक राष्ट्रागाणं संपन्न झाले.याप्रसंगी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी भारत माता की जय तसेच प्रजासत्ताक दिन चिरायू होवो च्या उपस्थितांच्या वतीने एकच जयघोष करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ते व विधिमंडळ समनवयक-संजय खोडके,यश खोडके यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *