देशाची एकता – अखंडता आणि सार्वभौमत्व आमच्या प्रजासत्ताकाला बळकटी देत आहे – आमदार सौ. सुलभाताई खोडके.

  • दि अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड येथे ७५ वा गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा
  • आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी दिल्या ७५ व्या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा

अमरावती २६ जानेवारी : आम्हा भारतीयांना आमचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना अभिमान वाटतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपली राज्यघटना स्वीकारली. आणि स्वतःला वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त केले. भारताने जगात सार्वभौम राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख कायम केलेली आहे. याच दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. याचदिवशी देशातील प्रांतांना राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला आणि देशात संघीय प्रणाली लागू करण्यात आली. देशाची एकता अखंडता आणि सार्वभौमत्व हे आमच्या प्रजासत्ताकाला बळकटी देत आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी २६ जानेवारी गणतंत्र दिवसाचे निमित्ताने उपस्थितांना संबोधून केले.शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी दि. अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड, अमरावती जवाहर रोड स्थित मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दि अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड अमरावती च्या अध्यक्षा आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बँकेच्या संचालिका-पुष्पाताई गावंडे, मंदाकिनी बागडे, ज्योत्स्ना कोरपे, मुख्य कार्यकारी अधिकारी-ऋषिकेश भामोदकर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम याप्रसंगी राष्ट्रध्वज तिरंगाला उपस्थितांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वज तिरंगाला सलामी दिली. याप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत – राष्ट्रगाणाने उपस्थितांनी राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी दि अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड, अमरावती चे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *