थोरगव्हाण येथे दारु बंद करण्यासाठी महिलांची ग्रामपंचायत कार्यलय व दारु विक्रेत्याच्या घरावर काढला मोर्चा

  • शेकडो महिला पुरुष मोर्चात सहभागी
  • दारु विक्री बंद करण्याची दिली समज
  • दारु विक्रेत्याची दबंगगीरी सहन करणार नाही महिलांचा कठोर निर्णय

गोकुळ कोळी, प्रतिनिधी, यावल

यावल : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण गावात ग्रामपंचायतने आयोजीत केलेल्या ग्रामसभेत गावात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री विक्री कायम स्वरुपी बंद करण्याचा ठराव करीत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यं, पोलिस पाटील व गावातील महिलां व पुरुष यांनी थेट दारु विक्रेत्याच्या घरासमोरुन जावून दारु बंद करण्याची मागणी केली आहे. थोरगव्हाण ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच सौ. मनिषा समाधान सोनवणे यांच्या अध्यस्थांनी आयोजीत करण्यात आली होती. ग्रामसभेत ग्रामसेवक भरत पाटील यांनी अंजेडा वरील विषय उपस्थित ग्रामस्थ व महिलांना वाचून दाखविले.

गावात अवैध पणे हातभट्टी ची दारु व देशी विदेशी दारु पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे राजरोजपणे खुलेआम विक्री होत असल्यामुळे गावात अनेकांची घरे उदव्धस्त होत आहे तर काही कीरकोळ वाद होऊन शांतता भंग होत असल्यामुळे संतप्त महिलांनी गावातील दारु बंदी कायम स्वरुपी बंद करण्यासाठी महिला सरपंच सौ मनिषा समाधान सोनवणे यांना निवेदन दिले. सतंप्त महिला व पुरुष यांनी निवेदन देवून थेट दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा नेला व समज देवून दारु विक्री तात्काळ बंद करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशला देवून देऊन कारवाईची मागणी करु अशी विनंती करीत शांततेत दारु विक्रेत्याच्या घरी मोर्चा काढुन समज दिली आहे. गावात तीन चार ठिकाणी अवैध हातभट्टीची पन्नी दारु व देशी विदेशी दारु राजरोजपणे विक्री करीत असलेल्या दारु विक्रेत्यानी महिलांचा विनंतीला मान देत दारु बंद करण्यासाठी होकार दिला तर काहिनी दबंगगीरी करीत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *