विदर्भ स्तरीय दृष्टीबाधीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत डॉ. नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय, अमरावती विजयी

दि. ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन, अमरावती व्दारा संचालीत डॉ.नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय व आश्रित अंच कर्मशाळा, अमरावती यांनी संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष स्व. आबासाहेब देवस्थळे स्मृती प्रित्यर्थ विदर्भ स्तरीय नेत्रहीन विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय खुले गट क्रिकेट स्पर्धा दि. २७ जानेवारी २०२४ रोजी एस.आर.पी.एफ. मैदानावर आयोजित केल्या. स्पर्धेमध्ये विदर्भातील नागपुर, बरोरा (चंद्रपुर), अकोला, चिखलदरा व अमरावती इत्यादी जिल्हयातील नेत्रहीन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी ९.०० वाजता या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अमरावती विद्यापीठ येथील शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख मा.डॉ. तनुजा राउत यांच्या अध्यक्षतेखाली उ‌द्घाटक मा. श्री.एस.डी.कराळे (उप अधिक्षक, एस.आर.पी.एफ) यांच्या हस्ते प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाज सेवक डॉ. गोविंदभाउ कासट, संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण मालपाणी, सचिव.मा. अॅड. प्रदीप श्रीवास्तव, मुख्याध्यापक श्री.नवनाथ इंगोले व व्यवस्थापकीय अधिक्षक श्री. पंकज मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.नवनाथ इंगोले यांनी केले व कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रशांत गाडगे यांनी केले व आभार प्रदर्शन व्यवस्थापकीय अधिक्षक श्री. पंकज मुद्गल यांनी केले. क्रिकेट स्पर्धा बादफेरी पध्दतीने खेळवल्या गेले. अंतिम लढत डॉ. नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय, अमरावती व ज्ञानज्योती अंध विद्यालय, नागपुर यांच्या मध्ये अंत्यंत रोमांचक व चुरसीचा सामना झाला. त्यामध्ये डॉ. नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय, अमरावती या संघाने विजय मिळविला. यावेळी नेत्रहीन विद्यार्थ्यांमध्ये अतीउत्साह पहावयास मिळाला. दुपारी ५.०० वाजता सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा पार पडला हा कार्यक्रम मा. डॉ. अविनाश चौधरी (सुप्रसिद् किडनी विशेषज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली श्री. के. पी. येलमोरे (डी.वाय.एस.पी.) एस.आर.पी.एफ अमरावती श्री. चंद्रकांतजी पोपट, श्री.गोविंदभाउ कासट (जेष्ठ समाजसेवक), श्री. चारुदत्त चौधरी (जे.सी.आय) व संस्थेचे सचिव अॅड. प्रदीप श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत संवन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन व्यस्थापकीय अधिक्षक श्री.पंकज मुद्गल यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. नवनाच इंगोले यांनी केले. यावेळी प्रथम पारीतोषीक म्हणून स्व. गोविंदराव मुद्‌गल फीरता चषक ट्रॉफी व ५००१/- रोख पारीतोषिक देण्यात आले. व व्दितीय पुरस्कार स्व. मंगलभाई जीवनभा पोपट यांच्या स्मृतीमध्ये ट्रॉफी व ४००१/- रोख रक्कम व्यतीरीक्त बेस्टबॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी सिरीज, इत्यादी प्रकारची वैयक्तिक पारीतोषीकांचा वर्षाव करण्यात आला. उपस्थित अतिथी गणांनी रोमांचक झालेल्या अंतिम सामन्याचा आनंद घेतला व सामना बघुन खेळाडूंकरीता स्तुतीसुमने उधळली. सामन्याचे धावते वर्णन विशेष शिक्षक श्री.योगेश चौधन यांनी केले मैदानावरील सामने व्यवस्थीत पार पाडण्याची जबाबदारी श्री.रमेश राठोड, सौ. योगिता राउत श्री. पंकज मुद्गल, श्री. प्रशां गाडगे, श्री. निळकंठ नाथे कर्मचारी श्री. साकोळकर, भानुदास तायडे, दिलीप तायडे, कळंबे, यांनी उत्तमपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता अमरावतीमधील अनेक दानदात्यांचे योगदान लाभले त्यामध्ये अमरावती शहरातील प्रतिष्ठी व्यापारी, नामाकीत डॉक्टर, समाजसेवक, अभिनंदन बैंक, महात्मा फुले बैंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अमरावती इत्यादीच समावेश होता. कार्यक्रमाकरीता ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले तसेच उपस्थितांचे, अमरावतीकरांचे व प्रसारमाध्यमांचे व तसे स्पर्धेकरीता एस.आर.पी.एफ.बल. गट.क्र.९ या विभागाने मैदान उपलब्ध करुन दिले. याबददल संस्थेच्या वतीने मुख्याध्याप श्री.नवनाथ इंगोले यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *