बेलोरा विमानतळावरून नाईट लँडिंग व मराठी भाषा विद्यापीठासाठी अर्थसंकल्पात तरतूद

  • आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मानले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार
  • राज्याच्या अर्थसंकल्पिय तरतुदींचा अमरावतीला लाभ होईल -आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती २७ फेब्रुवारी :- आज पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून अमरावतीला भरपूर काही मिळाले आहे. अशातच महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांनी वर्ष २०२४-२०२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अमरावती बेलोरा विमानतळ येथून लवकरच नाईट लँडिंग सुरु करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली . तसेच जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ लवकरच सुरू करण्यासंदर्भात सुद्धा तरतूद करण्यात आल्याची घोषणा मंत्रीमहोदयांच्या वतीने आपल्या अर्थसंकल्पिय भाषणातुन करण्यात आली . या बद्दल आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

मागील दहा वर्षांपासून अमरावती बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तार झाला नाही , अनेक कामे निधी अभावी प्रलंबित आहेत . परिणामी अनेक चांगले उद्योग अमरावतीमध्ये येऊ शकत नाही , बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तार तसेच ७२ आसनाची प्रवासी सेवा , सोबतच नाईट लँडिंग आदी कामांकरिता निधीची आवश्यकता असून याबाबत आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना पत्र देऊन अवगत केले. या संदर्भात आता महाराष्ट्र विधान सभेच्या अर्थसंकल्पात बेलोरा विमानतळ येथून नाईट लँडिंग सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांनी घोषणा केली . तसेच २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दीन म्ह्णून साजरा करतात. आणि आजच्या दिवशी ना.अजितदादा पवार यांनी राज्याचे अंतरिम बजेट सादर करून अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरु करण्यासंदर्भात राज्याच्या वर्ष २०२४-२०२५ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली.

यासह मंत्री महोदयांनी युवक , महिला , गरीब व अन्नदाता शेतकरी या चार घटकांना केंद्रबिंदू मानून या अर्थसंकल्पात अनेक महत्वपूर्ण तरतुदी व विविध योजनांसाठीच्या मंजुरीबाबत घोषणा करण्यात आली. शहरी भागाच्या विकासाच्या दृष्टीने नळ जोडणी , महिला सुरक्षा , बाल विकास केंद्र , पायाभूत सुविधा , अल्पसंख्याक घटक व मागास प्रवर्गातील लोक समूहाकरिता योजनांसाठी सुद्धा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे . याचा निश्चितच लाभ अमरावती शहरवासीयांना होणार असल्याने आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *