अमरावती शहरातील अल्पसंख्यांक बहुल भागात पायाभूत सुविधांसाठी ४.६९ कोटींचे अनुदान मंजुर

  • आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मानले उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार
  • आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती

अमरावती २६ फेब्रुवारी :- शहरातील अल्पसंख्यांक बहुल भागात सुसज्ज रस्ते , नालीचे बांधकाम. सौंदर्यीकरण तसेच अन्य आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याला घेऊन आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहे. या अंतर्गत सदर भागाचा चेहरा -मोहरा बदलला असून नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे. याच शृखंलेत आता अमरावती शहरी भागात क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास ४.६९ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. वर्ष २०२३-२४ च्या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पिय निधी मधून अमरावती शहरातील अल्पसंख्यांक बहुल भागात पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी ४.६९कोटींचे अनुदान वितरित करण्यात मंजुरी देण्यात आल्या बद्दल आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास राज्यशासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. या संदर्भात शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय जारी करून संबंधित जिल्हाधिकारींनी मंजूर विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही तात्काळ करावी , असे निर्देश दिले आहेत.

वर्ष २०२३-२०२४ मध्ये अर्थसंकल्पीय निधीच्या प्रमाणात विकास कामांना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भातील अनुदान वितरित करण्यात यावे अशी मागणी आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . मागील पुरवणी मागणी मध्ये सुद्धा याबाबतचा पुनरोच्चार करण्यात आला होता . अखेर राज्यशासनाच्या यंदाच्या बजेट पूर्वी अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये अमरावती शहरी भागात पायाभूत विकासाची कामे करण्याला घेऊन ४.६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे . या संदर्भात अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पाठपुरावा केल्याने बजेटपूर्वीच शहराच्या अल्पसंख्यांक बहुल भागात पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजित दादा पवार यांचे आभार मानित अभिनंदन केले आहे.

अमरावती शहरी भागातील अल्पसंख्यांक बहुल भागात ही होणार कामे

पॅराडाईज कॉलनी येथील रोडचे बांधकाम करणे ३६ लक्ष , झोन क्रमांक १ मधील गुलशन कॉलनी उर्दू शिक्षक कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम २५ लक्ष , फैज कॉलनी येथील रस्त्याचे बांधकाम करणे १३ लक्ष , अन्सार नगर येथील रस्त्याचे बांधकाम १० लक्ष , हजरत मुशीर कॉलनी येथील रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष , प्रभाग क्रमांक १६ अलीम नगर रहमत नगर , कबीर नगर येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे १६ लक्ष , वाहेद खान डी.एड. कॉलेज समोरील रस्ता बांधकाम व नाली बांधकाम करणे ३९ लक्ष , पठाण चौक ते रफिक भाई ट्रॉलीवाले छाया नगर रोड पर्यंत काँक्रीट रोड बांधकाम करणे ४३ लक्ष , प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत हुसेन नगर येथील नालीचे बांधकाम करणे १० लक्ष , प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत इमामनगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे १५ लक्ष , प्रभाग क्रमांक ३ नवसारी मधील कबीर नगर अफवान नगर , खोजा मस्जिद पर्यंत खडीकरण करणे २८ लक्ष , झोन क्रमांक १ मधील सुफियान नगर नं . १ येथील नालीचे बांधकाम करणे १२ लक्ष , प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत लालखडी येथील रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष , वाहेद नगर येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे २२ लक्ष , प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत लालखडी येथील रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष , झोन क्रमांक १ सुफियान नगर नं. २ येथील रस्त्याचे बांधकाम करणे १२ लक्ष , आझाद नगर येथील पूल तयार करणे २५ लक्ष , प्रभाग क्रमांक ३ येथील अराफत कॉलनी येथे उर्दू स्कुल नं. ९ येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लक्ष , प्रभाग क्रं. ४ अंतर्गत हुसेन नगर येथील नालीचे बांधकाम करणे १० लक्ष , पॅरामाऊंट कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे १८ लक्ष , फातेमा कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे १८ लक्ष , इमाम नगर येथील रस्त्याचे खडीकरण करणे १६ लक्ष , सहारा नगर यंतेहील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे १८ लक्ष , निशाद कॉलनी , पॅराडाईस कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे १२ लक्ष , सुफियान नगर नं.३ येथे खडीकरण व डांबरीकरण करणे १६ लक्ष, सुफियान नगर येथे खडीकरण व डांबरीकरण करणे १५ लक्ष अश्या एकूण ४.६९ कोटींच्या पायाभूत विकास कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *