स्त्री – पुरुष या दोन्ही घटकांना सशक्त आणि प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे हे समाजाचे कर्तव्य आहे – आमदार सुलभाताई खोडके

  • महिलांना या जगात समान पातळीवर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे-आमदार सौ.सुलभाताई खोडके
  • जागतिक महिला दिन २०२४ स्त्री भ्रूण हत्या जनजागृती, सामूहिक नृत्य, फॅशन- शो, साक्षरता अभियान, जोगवा सादरीकरण ठरले मुख्य आकर्षण
  • महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था ( महिला आघाडी ) द्वारे भव्य आयोजन

अमरावती ( प्रतिनिधी ) दिनांक १० मार्च-स्त्री-पुरुष समानता समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्रीला समाजात स्वतः ची ओळख निर्माण करण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारण्यास सर्वांनी स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तिला आत्मनिर्भर बनविले पाहिजे. कुटुंबातील महिलांच्या विकासामुळेच देशाचा विकास होईल, हे मात्र विसरून चालणार नाही. महिला स्वातंत्र्य हेच महिला दिन साजरा करण्याचे खरे सार्थक आहे. दिनांक ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी, स्त्रियांच्या आर्थिक ,राजकीय आणि सामाजिक विकासासाठी ,तसेच कोणत्याही क्षेत्रात महिलांविरुद्ध होणारा भेदभाव रोखण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. समाजातील स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांना सशक्त आणि प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. संपुर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरण या शब्दांचा वापर केवळ शब्द म्हणून करू नये त्यापेक्षा महिलांना या जगात समान पातळीवर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा नारीशक्तीने दिलेले योगदान हे अविस्मरणीय असे आहे. शिक्षण, कला, विज्ञान, राजकारण तसेच भारतीय लष्करात सुद्धा महिलांनी आपल्या भरीव योगदानाची छाप पाडीत आपल्या कार्यकर्तृत्वाची देशाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. सर्व विकास धोरणे आणि योजनांमध्ये महिलांच्या सर्व हक्कांचे तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतर संधींचे सरंक्षण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने ठोस प्रयत्न केले जाते आहे.सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महिला सक्षमीकरणात सर्वांचेच सामूहिक योगदान महत्वपूर्ण ठरू पाहत आहे. सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देण्यासह माझे सर्व महिला भगिनींना विनंतीपूर्ण आवाहन आहे की महिला ऐक्यातूनच सामूहिक वाटचाल सुकर होत असल्याने या नारीशक्तीच्या ताकदीला अधिकाधिक बळकटी देऊया. असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी जागतिक महिला दिन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधून केले. शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था ( महिला आघाडी ) अमरावती च्या वतीने शिवाजी चौक-पंचवटी परिसर समीपस्थ मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था ( महिला आघाडी ) प्रमुख-सौ.निलिमाताई दिपकराव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उदघाटक म्हणून प्रादेशिक महिला आघाडी प्रमुख विजयश्री गणोरकर,सामाजिक कार्यकर्त्या किरणताई मेहरे,.अनिता खवले,विदर्भ सदस्य निलिमाताई दिलीपराव लोखंडे,आदी उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथी मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करण्यात आले.तदनंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यादरम्यान सप्तसुरांच्या सुरेल स्वागतगीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था ( महिला आघाडी ) च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे वतीने आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांचा शाल-श्रीफळ-स्मृतिचिन्ह-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सामाजिक-राजकीय-आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अतुलनीय कामगिरी बजावीत अमूल्य योगदान देणाऱ्या ऍड.सौ.छाया घाटोळ ( मिश्रा), अरुणा चौधरी, उज्वला लंगडे, यांचा आमदार-सौ. सुलभाताई खोडके, निलीमाताई लोखंडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यादरम्यान महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष-प्रभाकरराव घाटोळ, कार्याध्यक्ष-दिपकराव लोखंडे,कोषाध्यक्ष-प्रा. रुपेश फसाटे, सचिव – प्रवीण पेठकर, उपाध्यक्ष-संजयराव गणोरकर, सदस्य-संतोषराव मालधुरे, संपादक – केशवराव फसाटे, संजय वाघोडे, व डॉ.विजयराव भोजने यांच्या हस्ते आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या वतीने संस्थेला वेळोवेळी लाभणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी फॅनी डान्स, बंजारा नृत्य, जोगवा, फॅशन-शो, सामूहिक नृत्य, मराठमोळी लावणी, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती आदी विषयावर आधारित सादरीकरणाला उपस्थितांच्या वतीने वन्स-मोअर च्या गजरात दाद देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम, कला व नृत्याविष्कार, तसेच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची आयोजन व अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महिला एकजूट आहोत.असा अभिनव संदेश देत याप्रसंगी कला व नृत्याविष्कार सादरीकरण करतांना’ मिळून साऱ्या जणी ग… ‘अशी प्रचिती यावेळी नारीशक्तीच्या वतीने उपस्थितांना घडवून दिल्याचे चित्र यावेळी कार्यक्रम स्थळी दिसून आले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-मंगला चांदूरकर-सविता पेठकर यांनी तर प्रास्ताविक – मंगला मंगळे यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे वंदना कांडलकर यांनी आभार मानले. याप्रसंगी वर्षा भुसारी, मंगला चांदूरकर, सविता घाटोळ, जया खासबागे,भाग्यश्री टवलारे, मीनल हरणे, संगीता मालधुरे, शुभांगी फसाटे, अपर्णा डहाके, योगिता बुले, निलांबरी हाडोळे, पल्लवी ओंकार, वंदना कांडलकर, माया खरबडे, छाया दिंडेकर, डॉ. सपना केने, मंदा धनोकार, निलिमा मालपे, चंद्रलेखा केवटे, सोनाली होले, जयश्री कडू, मंगला मंगळे, अंजली सारडे, सुनीता उमप, सपना सिनकर, जया होले, सोनाली भगत आदींसह महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच आमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *