अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा) पाटील मंत्री, उच्‍च व तंत्र शिक्षण, वस्‍त्रोद्योग, संसदीय कार्य तथा पालकमंत्री, अमरावती जिल्‍हा यांच्‍या शुभहस्‍ते अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे भुमिपूजन तसेच पुर्ण झालेल्‍या कामांचे लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक ९ मार्च,२०२४ रोजी दुपारी १२.१५ वाजता विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. यावेळी सर्व मान्‍यवरांचे स्‍वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्‍यात आली. या सोहळ्यात मा.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ व सन्‍मानचिन्‍ह देवून महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार यांनी सत्‍कार केला.

विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. ई टपाल सेवा, घनकचरा सी.अॅन्‍ड डी वेस्‍ट (ऑनलाईन) व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प, जिल्‍हा नियोजन समिती नाविन्‍यपूर्ण घटका अंतर्गत मोठ्या प्राण्‍यासाठी शवदाहिन उभारणे, प्राणी निवारा केंद्र तथा पशु उपचार केंन्‍द्र रहाटगाव व कोंडेश्‍वर येथे उभारणी करणे, संत गाडगेबाबा अभ्‍यासिका कॅम्‍प, १५ वा वित्‍त आयोग अंतर्गत उत्‍तम नगर येथे आरोग्‍य शिबिरे मंदिर चे बांधकाम या विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपूजन मा.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

प्रास्‍तावना करतांना महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार यांनी सां‍गीतले की, विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये नव्याने झालेले विस्तारीकरण यामध्ये एकुण बांधकाम दुसरा मजला = 393 चौ.मी. (4230 चौ. फुट) व तिसऱ्या मजल्याला = 224.06 चौ.मी. (2412 चौ. फुट) मंजुर आहे. दुसरा मजला सभागृहामध्ये मुख्य स्टेज वर आसनक्षमता एकुण ४ व सन्मा. सदस्य यांची आसन क्षमता एकुण 108 आणि मनपा विभाग प्रमुख आसन क्षमता 60 पर्यंत आहे. सभागृहामध्ये संपुर्ण विद्युत, संगणक, Led Screen आणि वातानुकुलीत तयार केलेला आहे. सभागृहालगत महापौर, आयुक्त कक्ष, तसेच Corideor, Waiting hall, लॉबी व पुरुष व स्त्रीयांकरीता स्वच्छतागृह ची व्यवस्था केली आहे. तिसऱ्या मजल्यावर Corideor, Waiting hall, लॉबी, पुरुष व स्त्रीयांकरीता स्वच्छतागृह आणि पत्रकार कक्ष, नागरीकांकरीता कक्ष, विद्युत व संगणक व्यवस्था इत्यादी सोयी युक्त बांधकाम पूर्ण केलेले नाहे. अत्याधुनिक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिपूर्ण बांधकाम व त्या सोबत इतर कक्षांचे साज सजावट नुसार बांधकाम वातानुकुलीत तयार करण्यात आलेले आहे.

संगणक विभागामार्फत दिव्यांगाच्या सोई साठी ऑनलाईन प्रणाली सूरू करण्यात आली आहे (amcdiwyangakalyan.com), बाजार परवाना, गाळे नुतनीकरण व हस्तांतरण या करीता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे, महिला बाल विकास विभागातील सर्व योजना करीता ऑनलाईन प्रणाली सूरू करण्यात आली आहे, मनपा मुख्यालय व ५ प्रभाग कार्यालयात नागरिकांना सुविधा केंद्र सूरू करण्यात ओले आहे तसेच नागरीक सुविधा केंद्रात जन्म मृत्यु दाखले, विवाह प्रमाणपत्र, फायर NOC, मालमत्ता कर भरणा केंद्र ई-सुविधा सूरू करण्यात आली असून www.amravaticorporation.in या संकेत स्थळावरून नागरीकांना विविध सेवा ऑनलाइन रित्या पुरविण्यात येतात.

e-tapal सेवा सूरू करण्यात आली आहे यामार्फत अर्ज हे Online पद्धतीनेच आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित विभागास पाठविण्यात येतील व तसेच झालेल्या कार्यवाहीचा पोच सुद्धा नागरीकांना SMS द्वारे मोबाईलवर मिळेल त्यामुळे अर्जाची सद्यस्थितीचा शोध घेणे सोपे होईल. ही प्रक्रीया पुर्णपणे Paper less असल्यामुळे फाईल/निवेदन/अर्ज गहाळ होण्याचे प्रमाण कमी होईल.

राज्य सरकार, केंद्र सरकार व महानगरपालिका संयुक्त विद्यमाण नुसार C&D कचऱ्याची तांत्रिक व रितसर विल्हेवाट लावण्यासाठी C&D कचरा नियम २०१६ च्या अनुषंगाने बांधकाम व पाडकाम (Construction & Demolition waste) प्रकल्प ७५ TPD चा तयार करण्यात आला असून त्याची अंदाजपत्रकीय रक्कम रु ५,५३, ३८,८२७/- आहे. सदर कंपनी लवकरच तांत्रिक पध्दतीने प्रकल्प सुरु करून C&D बेस्टची विल्हेवाट लावुन पेविंग ब्लॉक किवा विटा तयार करून अमरावती महानगरपालिकेला रॉयल्टी देणार आहे. त्यामुळे महानगर पालिकेला आर्थिक, तांत्रिक व सामाजिक स्वरूपात निश्तीतच फायदा होणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये दैनंदिन स्वरुपात होणारे मोठ्या प्राण्यांचे मृत्यु व त्यांचे मृतदेहांचे विल्हेवाट लावणे व त्यावर शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया करुन सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण व प्राणी जन्य (Zoonotic Disease) आजार या संबंधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता, नाविण्य पूर्ण योजना अंतर्गत, सदर प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत १ कोटी रुपये निधी प्राप्त झाला. सदर प्रकल्पामुळे अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनावरांच्या मृत देहामुळे निर्माण होणारे प्रदुषण, हवेतुन पसरणारे रोग तसेच मृत देहामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान यावर प्रतिबंध येणार आहे. सदर प्रकल्पामुळे विविध प्रकारच्या प्राणीजन्य आजारापासुन मानवी जिवनास होणारा धोका, कमी होणार आहे.

सदर प्रकल्पामुळे मानवी जिवनामध्ये Zoonotic Disease, Airborn Dieaseas, Contagious Dieuseas या आजारांचे प्रमाण कमी होणार असुन, सदर आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होऊन सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण यांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे. सदर प्रकल्पा संबंधी ७/०२/२०२४ रोजी कार्यरंभ आदेश देण्यात आले तसेच प्रकल्पा संबंधी तांत्रिक साहित्याचा पुरवठा करण्यात आला असुन सुकळी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी सदर प्रकल्पाचे उभारणी संबंधी प्रक्रीया सुरु करण्यात येत आहे.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुत्र्यापासुन निर्माण होणा-या समस्या अंतर्गत सन २०२३-२०२४ मध्ये एकुण १५,५७९ श्वान दंशाच्या केसेस यांची नोंद झालेली आहे. नागरी वस्त्यांमध्ये श्वानांच्या हल्यामध्ये नागरीक व लहानमुले यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहे, यावर नियत्रण व उपाययोजना करण्याकरीता शासन निर्णय, मा. सर्वोच्च न्यायालय तथा नगर विकास विभाग यांचे पायाभूत सुविधा बाबत निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये भटके श्वान तथा रेबीज ग्रस्त, जखमी, अपंग बेवारस अशा प्रकारच्या श्वानासाठी श्वानगृह, श्वाननिवारा केंद्र, उपचार केंद्र तयार करणेकरीता जिल्हा नियोजन समिती यांचे मार्फत नाविण्य पुर्ण योजने अंतर्गत निधी प्राप्त झाला असुन, सदर प्रकल्पाचे कार्यरंभ आदेश दि.०६/०३/२०२४ रोजी देण्यात आलेले आहे. सदर प्रकल्पामुळे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातमध्ये सद्यास्थितीमध्ये असणारे २० ते २५ हजार श्वानांचे शस्त्रक्रिया, लसिकरण व उपचार, निवारा याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.

अमरावती महानरपालिका तसेच आजुबाजुच्या खेडेगावातील विद्यार्थ्यांना विवीध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरीता शहरात पुणेकिंवा मोठ्या शहराचे धर्तीवर तत्कालीन वेळी क्लासरुम व फारशे संसाधने उपलब्ध नसल्याने सन 2010 मध्ये अमरावती महानगरपालिका महिला व बालविकास विभागाद्वारा नाविण्यपुर्ण प्रकल्प हाती घेवुन मनपाच्या जुनया शाळेच्या इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासीका /ग्रंथालय सुरु करण्यात आले. सदर अभ्यासीकेचे नाव संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधीनी ( ग्रंथालय/ अभ्यासीका) असे करण्यात आलेले आहे. अनेक गरीब तसेच शहरातील होतकरु तरुणांना रोजगाराचीदिशा देणारा महानगरपालिकेचा बटवृक्ष म्हणता येईल. यामध्ये वाढत्ती लोकसंख्या व विद्यार्थ्यांची वाढती संख्या व प्रतिक्षा यादीचा विचार सन 2019 मध्ये इमारतीचा विस्तार करण्याकरीता जिल्हा वार्षीक योजनेमध्ये 120.52 लक्ष रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्यामध्ये जिल्हा वार्षीक योजनेमधुन 50 लक्ष रुपये निधी मंजुर होवुन प्राप्त झाला. उर्वरीत 70.52 लक्ष रुपये मनपा निधीतुन देण्यात आले. या केंद्राचे माध्यमातुन 379 विद्यार्थी शासकीय सेवेत विवीध पदावर नियुक्त.

अमरावती महानगरपालिका क्षेत्राची सध्याची लोकसंख्या अंदाजी 8.5 ते 9 लक्ष इतकी असून येथील नागरिकांना अमरावती, महानगरपालिकेतर्फे आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (एन युएच एम) अंतर्गत अमरावती शहरात एकूण 13 शहरी आरोग्य केंद्र कार्यान्वित असून तेथे आरोग्य सेवा देण्यात येते. तसेच पंधराव्या व्रित आयोग अंतर्गत नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिर स्थापन करण्याचे निर्देश शासनाकडून आलेले असून त्या अंतर्गत आर्थिक वर्ष 22-23 अंतर्गत पहिल्या टप्प्यात 12 आरोग्य मंदिर ची मान्यता मिळाली व ते पूर्ण झाले असून कार्यान्वित झाले आहे. तसेच या अंतर्गत बांधकामात एक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बांधलेला असून तो पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष 23-24 अंतर्गत आणखी 17 आरोग्य मंदिर ची मान्यता प्राप्त झाली असून त्या अंतर्गत सर्व आरोग्य मंदिर केंद्राचे काम मनपा जागावर चालू असून ते अंतिम टप्प्यात आहे व नजीकच्या एका महिन्यात पूर्ण होनार आहे. या नवीन सतरा जागांपैकी उत्तम नगर आरोग्य मंदिर हे पहिले पूर्ण होणारे केंद्र आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिर मध्ये एक डॉक्टर एक स्टाफ नर्स एक अटेंडंट व एक सफाई कर्मचारी याप्रमाणे कर्मचारी वर्ग असणार आहे व प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिर स्थापन करण्यासाठी इमारतीच्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून 21.5 लक्ष प्रति केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

पालकमंत्री महोदयांनी विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्‍या कामाचे कौतुक केले. हे सभागृह भव्‍य दिव्‍य झाले असून या ठिकाणी येण्‍यासाठी अनेक नगरसेवक आतुर राहतील. शासन निधी देत राहतो पण त्‍याची अंमलबजावणी योग्‍यरितीने होणे गरजेचे आहे आज या सभागृहाचे लोकार्पण करतांना मनस्‍वी आनंद होत आहे. प्रत्‍येक बाबीकडे योग्‍य लक्ष्‍य देवून हे सभागृह बांधण्‍यात आले आहे. आज अनेक कामाचे भुमिपूजन व लोकार्पण करण्‍यात आले असून महानगरपालिकेला यापुढे कोणतेही सहकार्य लागल्‍यास ते नक्‍कीच करण्‍यात येते. महानगरपालिका आयुक्‍त देविदास पवार यांनी अतिशय उत्‍कृष्‍टरित्‍या या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सदर प्रकल्पामुळे प्राणघातक असा ‘रेबिज’ हा रोग व केंद्र शासनाचे (मिशन रेबिज) याउपक्रमाबाबत भविष्यकालीन उपाययोजना पुर्ण होणार असुन, याउपक्रमामुळे अमरावती मधिल नागरीक, जेष्ठ नागरीक, लहान मुले यांचे ‘रेबिज’ या प्राणघातक रोगापासुन संरक्षण होणार आहे. सदर प्रकल्पा मुळे येणा-या भविष्यकाळात ‘मनुष्य व कुत्रा’ संघर्ष कमी होऊन ‘रेबिज फ्रि’ अमरावती व Puppy Free अमरावती हि संकल्पा पुर्ण होणार असुन, मनुष्य व कुत्रा संघर्ष याबाबत भारतीय जिवजन्तु कल्याण मंडळ, मा. सर्वोच्च न्यायालय, नगरविकास विभाग यांचे पायाभुत सुविधा निर्माण करण्यासंबधी आदेशाच्या अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते शहर अभियंता इकबाल खान, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, अभियंता राजेश आगरकर, कंत्राटदार जुजर सैफी यांचा शाल व पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार करण्‍यात आला.

या सोहळ्यात माजी उपमहापौर संध्‍याताई टिकले, कुसुमताई साहु, डॉ.गणेश खारकर, माजी स्‍थायी समिती सभापती सचिन रासने, राधा कुरील, माजी सभागृह नेता सुनिल काळे, माजी नगरसेवक हरीश जगमलानी, मिलींद बांबल, अजय सारसकर, संजय अग्रवाल, सुहास घोंगे, बलदेव बजाज, प्रदिप बाजड, धिरज हिवसे, नगरसेविका पद्मजा कौंडण्‍य, वंदना हरणे, सुनंदा खरड, वंदना कंगाले, रेखा भुतडा, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, पोलिस उपायुक्‍त श्री.शिंदे साहेब, शहर अभियंता इकबाल खान, महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे, विवेक देशमुख, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्‍हाण, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, एन.यु.एल.एम. विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी पी.यु.वानखडे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, श्‍याम चावरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, अभियंता, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक, स्‍वास्‍थ निरीक्षक, सफाई कामगार, मनपा कंत्राटी कर्मचारी, पारिचारीका, पोलिस कर्मचारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे सुत्रसंचालन महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे व आभार प्रदर्शन उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी केले. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरीता महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *