सुरक्षा व्यवस्थेत कपात करणे ही राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक – रामदास आठवले

मुंबई – राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करताना केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची ; कपात करण्याची राज्य सरकार ची भूमिका दुजाभाव करणारी अन्यायकारक आहे.माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठे थांबणार नाही. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे.रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही. असे उत्स्फूर्त प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.

जोगेश्वरी पूर्व येथील सारिपुत्त नगर येथे रिपाइं चे युवा जिल्हा अध्यक्ष दिवंगत भरत पाईकराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार कामानीचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी रिपाइं चे सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर,मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,डॉ विजय मोरे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव,फुलचंद कांबळे,ऍड.अभया सोनवणे,रमेश गायकवाड,चंद्रकांत पाटील,भीमराव सवातकर,उषाताई रामळू,गायिका वैशाली शिंदे तसेच दिवंगत भरत पाईकराव यांच्या मातोश्री रेशमाबाई पाईकराव,पत्नी राजश्री पाईकराव,आणि पूर्ण पाईकराव परिवार उपस्थित होते.

भारतीय दलित पँथर ही संघर्षमय चळवळ होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात भारतीय दलित पँथर च्या नेतृत्वात तरुणांचे थवे च्या थवे मुंबईत मोर्चात येत असत. याची आठवण ना रामदास आठवले यांनी यावेळी सांगितली. दिवंगत भरत पाईकराव आणि त्यांचे वडील चोखाजी पाईकराव हे अत्यंत लढाऊ पँथर होते.या दोघा पिता पुत्रांनी मला साथ दिल्याची भावना ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीने झोपड्यांना अभय देण्याचे काम आम्ही केले. झोपड्यांच्या जागी आता एसआरए मुळे इमारती उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेत 550 फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपाइं ची मागणी असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *