भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडिल हिमांशु पांड्या यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. हार्दिक आणि कृणाल या दोघांनच्या क्रिकेटर्स बनण्याच्या स्वप्नात वडील हिमांशू यांचे मोठे योगदान आहे. दोघांचे यश पाहून ते नेहमी भारावून जात कौतुक करत होते.
सुरत येथे हिमांशू यांचे कार फायनान्सचा बिस्नेस होता आणि तो त्यांनी बंद करून ते वडोदरा येथे स्थायिक झाले. त्यांनी दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. गोरवा येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ते रहायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *