८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे. मात्र नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार 87 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.

मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचं वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

BCCI कडं रणजी स्पर्धा घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. इंडियन प्रीमियर लीग IPL मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध राहवं लागेल.

रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आहे. सर्वप्रथम 1934 साली क्रिकेटर रणजित सिंग यांच्या नावे ही स्पर्धा खेळली गेली. रणजी ट्रॉफी इतिहासात मुंबईने सर्वाधिक 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर वसीम जाफर यांनी सर्वाधिक 10 हजार 738 धावा केलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *