जुनी पेंशन च्या लढ्यात आपण संघटने सोबतच-आ.सुलभाताई खोडके

  • महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा डीसीपीएस /एनपीएस धारकांचा मेळावा थाटात
  • एकच मिशन -जुनी पेन्शन चा नारा देऊन संघटनेचा लढा तीव्र

अमरावती ०१ फेब्रुवारी २०२१ : सेवानिवृत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांना पेन्शनचा मोठा आधार असतो . आपल्या सेवावेतनातील कपातीची रक्कम ही पेन्शन स्वरूपात अदा केली जाते . मात्र वाढती महागाई लक्षात घेता भविष्यात पेन्शनची रक्कम कमी ठरून पाहणार आहे . त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीसह निवृत्तीचे इतर लाभ मिळण्याच्या अडचणी दूर करून ही प्रक्रिया अधिक सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन आ. सुलभाताई खोडके यांनी केले .
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन अमरावती जिल्हा तर्फे आयोजित रविवारी पंचवटी चौक स्थित ऊर्ध्व वर्धा वसाहत ,मनोरंजन सभागृह येथे रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी झालेल्या डी.सी.पी.एस /एन.पी.एस धारक उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार वितरण , महिला मेळावा व स्नेहमिलन सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष नामदेवराव मेटांगे , तर प्रमुख अतिथी म्हणून ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे मंडळ अमरावतीच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे , सार्वजनिक बांधकाम विभाग उप-कार्यकारी अभियंता श्रीमती सुरेखा वाडेकर , जिल्हा कौशल्य विकास व उद्दोजकता विकास मंडळ अमरावतीच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर , उच्च श्रेणी खंड विकास अधिकारी धामणगाव रेल्वे माया वानखडे , संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख अतुल कडू , महिला व बालकल्याण अधिकारी मनपा नरेंद्र वानखडे ,जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी प्राथमिक प्रिया देशमुख, संघटनेचे विभागीय अध्यक्ष मिलिंद सोळंके , विभागीय महिला अध्यक्ष संचिता गोगटे , विभागीय सचिव कासीम जमादार ,जी.प.लिपिक कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष पंकज गुल्हाने , नदीम पटेल ,जिल्हाध्यक्ष गौरव काळे , उपाध्यक्ष योगेश पखाले , जिल्हा सचिव प्रज्वल घोम , जिल्हा महिला अध्यक्ष भावना राऊत आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . पुढे बोलतांना आ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले कीं ,वर्ष २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशकालीन पेन्शन योजना कार्यान्वित आहे . मात्र या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी सर्वस्तरातून जोर धरते आहे . ही मागणी रास्त असल्याने जुनी पेंशन मिळेपर्यंत आपण संघटनेच्या या लढ्यात सोबत असून हा विषय विधानसभा मध्ये मांडणार आहे . तसेच जुनी पेंशन लागू होण्या संदर्भात संघटनेची राज्य पातळीवर बैठक लावून हा विषय निकाली काढू , अशा शब्दात आमदार महोदयांनी उपस्थितांना आश्वस्त केले . महानगरपालिका अमरावती मधील जुन्या पेंशन चा विषय मार्गी लागावा, अनुकंपाशी संलग्नित विषयावर मनपा आयुक्तांशी चर्चा व बैठकीतून तोडगा काढणार असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी यावेळी सांगितले . या मेळाव्या मध्ये अध्यक्षीय भाषणात संघटनेचे राज्यउपाध्यक्ष नामदेवराव मेटांगे यांनी जुनी पेन्शन संदर्भातील आंदोलनात्मक लढयासंदर्भात माहिती दिली . महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मेळाव्यामध्ये जुनी पेन्शन योजनेसह ,फॅमिली पेंशन आणि ग्रॅज्युटी केंद्र सरकार प्रमाणे द्यावी , तसेच अनुकंपाधारकांना तत्वतः थोडा बदल करून डीसीपीएस- एनपीएस मय्यत कर्मचारी यांच्या वारसांना न्याय तात्काळ विना अट दयावा ,तसेच जो पर्यंत अनुकंपा पदभरती होत नाही तो पर्यंत मानधन तत्वावर महाराष्ट्रामधील सर्व कार्यलयात डीसीपीएस- एनपीएस मय्यत कर्मचारी यांच्या वारसांना न्याय दयावा, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांना तात्काळ द्यावी अशा विविध मागण्यांवर मंथन करून याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांचे लक्ष वेधले . दरम्यान संघटनेच्या वतीने डीसीपीएस -एनपीएस धारक उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार 55 कर्मचारी आणि अधिकारी यांना आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रितेश जगताप ,जिल्हा कोषाध्यक्ष यश बहिरम ,जिल्हा उपाध्यक्ष योगेश पखाले , संदीप गावंडे ,राजेश बगाडे ,प्रशांत दामेधर ,अक्षय साबळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन अमरावती जिल्हा व सर्व तालुका कार्यकारीणी व समस्त पेन्शन फायटर प्रामुख्याने उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *