शहरी भागातील पोलिओ लसीकरणाचा आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शुभारंभ

  • शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पाजण्यात आले दोन थेंब जीवनाचे
  • पोलिओ लसीकरणापासून एकही बालक सुटू नये – आ. सुलभाताई खोडके

अमरावती ३१ जानेवारी : पल्से पोलिओ लसिकरण मोहिमेंतर्गत अमरावती महानगर पालिकेच्या राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ गाडगे नगर स्थित संत गाडगे बाबा समाधी मंदिर येथे आ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दोन थेंब जीवनाचे पाजून त्यांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले . याप्रसंगी मनपा वैद्यकीय अधिकारी (आरोग्य ) डॉ. विशाल काळे , वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ सीमा नेताम , नगरसेविका सुरेखा लुंगारे , डॉ.जयश्री नांदुरकर , कृष्ठरोग सहायक शारदा तायडे, आरएचओ परिचारिका प्रतिभा थोरात एएनएम अस्मिता वैद्य ,आरोग्य सहायक किसन मदने , आरोग्य सेविका वर्षा कोठे , आलोक कोठे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते . दिनांक 27 मार्च,2014 मध्येक भारत देशास पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले. तरी सुध्दा खबरदारी म्ह्णुन पोलिओ मोहीम राबविली जाते .प्रत्येठक लाभार्थ्यांोपासून प्रत्येतक घरा-घरा पर्यंत पोहोचणारी ही लोकाभिमुख मोहीम आहे. शहरामधील लाभार्थ्यां पासून तात्पुनरत्या वसाहती, स्थयलांतरीत वसाहतींमधील लाभार्थी, झोपडपट्टी, बांधकाम, वीटभट्ट्या इत्यापदी ठिकाणी काम करणा-या कामगारांच्याा मुलांनाही सेवा मिळेल असे नियोजन महापालिकेने केले आहे. भारत देशातून पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी या मोहिमेला अधिक लोकाभिमुख बनविण्याचे आवाहन आ. सुलभाताई खोडके यांनी केले . दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील पल्स पोलिओ लसीकरण केंद्राला भेट दिली . यावेळी आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले . यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्याम सुंदर निकम , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप निरवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ . रेखा गोहाड , जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे , आरएमओ बाह्य- संपर्क डॉ . प्रशांत घोडाम , तसेच परिचारिका व आरोग्य सेविका व कर्मचारी आदी उपस्थित होते .
गत वर्ष भरापासून आपण सर्व कोरोना महामारीशी लढत आहोत . आरोग्य विभागातील डॉक्टर , परिचारिका, कर्मचारी हे एखाद्या योध्याप्रमाणे काम करून वैद्यकीय सेवा बजावत आहेत . असे असतांनाहीसार्वजनिक आरोग्य विभागाने साथरोग , कृष्ठरोग , क्षयरोग निर्मूलनाची मोहीम यशस्वीरीत्या राबवली , व आता पोलिओ लसीकरण मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी करून बालकांच्या पोलिओ मुक्तीसाठी दाखविलेली तत्परता व घेतलेली दक्षता ही प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार या. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले . पोलिओ लसीकरणापासून एकही बालक सुटू नये म्हणून गृहभेटी व आवश्यक तिथे प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात यावे , अशी सूचना आ. सुलभाताई खोडके यांनी या प्रसंगी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *