राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “संवाद कौशल्य” प्रशिक्षण कार्यशाळा…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती द्वारा संवाद कौशल्य या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते गुगल मिट च्या माध्यमातून हा वेबिनार घेण्यात आला.

कार्यशाळेमध्ये संवाद कौशल्य या विषयावर दिनेश गाडगे यांनी प्रशिक्षणार्थी यांचे सोबत संवाद साधला. संवाद म्हणजे नेमक काय ,संवादाचा इतिहास संवादाची माध्यमे व समाज माध्यमांचे बदलते स्वरूप आदि विषयांवर त्यांनी मत मांडले. सध्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर व्यक्तीमत्वामध्ये बदल घडवून कला कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पुढे वक्तृत्व कौशल्य यावर बोलताना भाषण देण्याच्या कल्पनेने जेवढी भीती वाटते तेवढे भाषण देणे नक्कीच भितीदायक नसुन वक्तृत्व हि प्रयत्न साध्य कला आहे. प्रभावी ईच्छाशक्ती, आत्मविश्वास व सराव या त्रिसूत्रीचा वापर करुन याला चिंतन व वाचनाची जोड दिली तर नक्कीच यश मिळवता येत असल्याचे ते म्हणाले. उत्तम संवाद किंवा वक्तृत्वासाठी देहबोली खुप महत्वाची ठरते त्यासाठी चेहरा डोळे आणी हातवारे यांचा खुबीने वापर कसा करावा तसेच भाषा आवाज आणी विराम यांचे महत्व त्यांनी विषद केले. दुसर्‍या सत्रामध्ये भाषण कसे तयार करावे संबोधन म्हणजे काय भाषणाची सुरूवात कशी करावी त्याचे प्रकार भाषणाचा मध्य कसा असावा आणी शेवट कसा करावा आणी त्याच्या पध्दती याविषयी विस्तृतपणे माहिती देण्यात आली.
सदर कार्यशाळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशील गावंडे यांच्या संकल्पन घेण्यात आली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन भातकुली तालुका अध्यक्ष (बडनेरा विधानसभा) अमोल भारसाकडे, आभार चांदुर रेल्वे तालुका अध्यक्ष आदेश राजनेकर यांनी केले. या कार्यशाळे करिता
अमोल भारसाकाळे, दीक्षित गावंडे, दिनेश गाडगे, मनोज गावंडे, ऋत्विक गावंडे, सुशील गावंडे, अंकुश घरड, अक्षय गिलबे, अनिरुद्ध होले, गजानन जळकर, राहुल जोशी, अमर कुकडे, सुशील निमकर, सचिन निर्मल, फिरोज पठाण, मयूर पाटील, मंगेश पोलहाड, कुलदीप पोटे, आदर्श राजणेकर, प्रफुल सानप, भूषण शेटे, साहिल सोलिव, वैभव ठाकरे, आकाश तिखिले, निखिल वडूरकर जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *