Breaking : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा समाजाला EWS आरक्षणाचा मिळणार लाभ

मुंबई – गेल्या महिन्यातच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलं. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली आहे. मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून राज्यातील ठाकरे सरकराने मराठा समाजाला EWS (economic weaker ) १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे.

मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामुळे मराठा समाजातील तरुणांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी १० टक्के आरक्षण मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार या आरक्षणाचा 10 टक्के फायदा घेऊ शकणार आहे.

राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता. तसा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, आता आधीचा निर्णय मागे घेत मराठा समाजाला EWS आरक्षण लागू करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारने हा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *