अकोल्यात शेतकऱ्याने उडीद पिकावर फिरवला ट्रॅक्टर

अकोला : शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अकोल्यातल्या सांगळूद येथील शेतकऱ्यांचे उडीद पिकांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे उडीद पीक हातून गेला आहे. ऐन फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकाला फुलगळती लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोटावेटर, ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले आहे.

काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे परिसरातील शेकडो हेक्टर पीक खराब झाले आहे. ऐन फुलोरा अवस्थेत असलेले उडीद पीक वातावरणातिल बदलांमुळे पीक हातून गेले आहे. खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उडीद पीक ट्रॅक्टरद्वारे नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले असून लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जिल्ह्यातल्या सांगळूद गावामध्ये उडदाचे पीक हे चांगल्या प्रकारे आले होते. परंतु वातावरणातील बदलामुळे संपूर्ण उडीदाचा फुलोरा निघून गेला असल्याने सांगळुद येथील अरुण तायडे या शेतकऱ्याने आपल्या ९ एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवून उडीद पीक नष्ट केले असल्याने या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अकोल्यात सकाळपासून जोरदार पाऊस

दरम्यान, गेल्या १० दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाची पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीन, उळीद अशा पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते. सकाळपासून पावसाची रिमझिम रिमझिम सुरू होती. पण आता पावसाचा जोर वाढला असून सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *