इतवारा बाजार येथील रस्ता बांधकामांचे आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन

  • नूर नगर, बिलाल नगरातील विकास कामांचे लोकार्पण
  • विकासाच्या नियोजित कृती आराखड्यातून मूलभूत सुविधांची पूर्तता

अमरावती ३० जानेवारी : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारा बाजार परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने या भागात येणाऱ्या व्यापारी ,कामगार व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर बाबीला गंभीरतेने घेऊन आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने मूलभूत सुविधांच्या ४५. २७ लक्ष निधीतून इतवारा बाजार परिसरात रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते रविवार ३० जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले.

अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याकरिता शासनाकडून भरघोस निधी मंजूर करून आणला असून या निधी अंतर्गत शहरात मूलभूत सुविधांच्या कामांची गतीने पूर्तता होतांना दिसत आहे. शहरातील विविध भागात सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे पसरत असल्याने परिसराला नवी चकाकी आली असून नागरिकांना विकासाचे पर्व अनुभवास मिळत आहे. याच श्रुंखलेत रविवार दिनांक ३० जानेवारी रोजी शहराच्या मुस्लिम बहुल भागात ७८.९१ लक्ष इतक्या निधीतून मूलभूत सुविधांच्या कामांना धडाका लावण्यात आला. आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने शासनाकडून मंजूर मूलभूत सोयी सुविधा कामांच्या विशेष अनुदानातील ४५. २७ लक्ष इतक्या निधीतून इतवारा बाजार पूजा टाईल्स ते मिट मार्केट ,कडबी बाजार , पोलीस चौकी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन करून आमदार महोदयांनी कामाचा शुभारंभ केला.

दरम्यान नूर नगर नंबर २ ते मेमन कॉलनी भागात रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर बिलाल नगर भागात २१. ७८ लक्ष निधीतून रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास आल्याने रस्त्याला नवी चकाकी आली आहे. या दोन्ही विकास कामांचे लोकार्पण सुद्धा आ. सौ .सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आमदार महोदयांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . तसेच स्थानिक परिसराची पाहणी करीत निवेदनाचा देखील स्वीकार केला .स्थानिक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यावरून अवागमन करतांना अनेक अडचणी येत होत्या . या गंभीर बाबीकडे आमदार महोदयांनी लक्ष देऊन विकास कामातून रस्त्याचे चित्र पालटल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत व आभार व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य जनतेचा विश्वास व पाठबळामुळे नेहमीची मतदार संघात काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. मूलभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण तसेच सर्वांगीण विकास कामांची पूर्तता करीत असतांना सर्व सामान्य जनतेची साथ मोलाची ठरू पाहत आहे. विकासाची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आपले प्रयत्न असून जनतेने हाच विश्वास व साथ कायम ठेवावी असे, मनोगत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक संजय खोडके ,जनाब जावेद सेठ, विशाल गुप्ता, आगाज चौधरी, अफसर बेग साहाब, वाहिदभाई, अखीलभाई मसालेवाले,हाजी ताजुद्दीन, श्याम गुप्ता, उस्मान कुरेशी, शाहजान कुरेशी, आसिफभाई मन्सुरी , यश खोडके , सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महादेवराव मानकर , स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हर्षद धांडे , इतवारा बाजार परिसरातील अतिकभाई मन्सुरी, हमीद भाई इतवारा, अश्फाक मोटर पार्ट, एहफाज चादर वाले, इस्लाम शटर वाले, कलीम भाई, आबिद भाई, लाल खा, सर्व जनाब जमील, झरीफ, जाकीर, जाकीरभाई टीनवाले , इल्यास पुठ्ठेवाले, फहीम लोहावाला, नाझीम फ्रिज वाले, बबलू, सुफियान, मोहसीन, रहीम छटाईवाले , शेख उस्मान कुरेशी, सय्यद इम्रान, रहमान पहेलवान, मोहम्मद तशकील, इस्माईल भाई फालूदावाले, शाहिद बेरिंगवाले, मुन्ना भाई हिंदुस्थान डोअर, मतीन लोहावाले, सलीम सागर, सलाम भाई मुर्तुजा, नसीम लोहवाला, शाहिद मन्सुरी, साजिद भाई लोहावाले, सिराज लोहावाले, सय्यद साबीर, हाजी नसिर बेरिंगवाले, तसेच बिलाल नगर भागातील गाजी जाहेरोश , ऍड . नईम साहब , आफाक खान , मोहम्मद शरीफ , जाहेद खान , नवाब गुलाम आरिफ, जाकीर खान , जफर भाई , शहजाद भाई , अब्दुल रहेमान , हाजी शौकत साहब, अमजद खान , दिभार अहमद , खुर्शीद खान , सिराज काजी , जाकीर भाई, अन्सार भाई कुरेशी , फैजल भाई , हाजी नसीम , इश्तियाक खान , आतिफ उमेर , मास्टर असरार, डॉ . अन्वर खान , साबीर भाई बोरिंगवाले , मौलवी मुशफिक साहब, मजीद मॅकेनिक , मोहिद खान , मोहसीन शाह , अब्दुल रज्जाक , राजिक भाई , त्याच बरोबर .नूर नगर नंबर २ मधील अफसर खान, जावेद पटेल, अब्दुल वकील, असिफ मेमन, अल्ताफ अहमद, एहफाज खान, मोहम्मद आरिफ, मोहम्मद शाकीर, कैस परवेझ, चाँद खा पठाण, रिझवान अहमद, नासिर अहमद, मुदस्सर अहमद, मोहम्मद अमीर, मोहम्मद अयान, अब्दुल रज्जाक, अब्दुल सत्तार, हाफिज ताज मोहम्मद साहब , मौलवी महमूद साहब , जावेद सेठ मन्सुरी, वाहिद खान, मतीन भाई लोहेवाले, रहमान भाई, शेख सलीम, सैफुद्दीन भाई, आसिफ भाई, ताज भाई, नासिर भाई आदीसह ऍड .शोएब खान ,हबीबखान ठेकेदार , सादिक रजा , फहीम मॅकॅनिक , इम्रानभाई , आबू शमा, सबदर अली मौलाना ,अफसर बेग , नदीम मुल्ला सर , वहीद खान , अबरार साबीर , नईमभाई चुडीवाले , ऍड . शब्बीर भाई , हाजी अख्तर हुसेन,सादिकभाई आयडिया , दिलबर शाह , समीउल्ला पठाण , मोहम्मद नाजीम सर , सादिक कुरेशी, आबिद सर, नाजीम सर, आसिफ सर , फारुखभाई मंडपवाले , मोईन खान यांच्या सह बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *