अमरावती । आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बाळांचे पोलिओ लसीकरण

  • गाडगे बाबा समाधी मंदिर केंद्रावर पल्स पोलिओ अभियान
  • पोलिओ हद्दपार पण खबरदारी महत्वाची – आ. सुलभाताई खोडके

अमरावती २७ फेब्रुवारी : गेली २५ वर्षे सातत्याखने पोलिओ निर्मुलनाकरीता सर्वांनी प्रयत्नह केल्याठमुळे व अथक परिश्रमामुळेच वर्ष २०१४ मध्ये- भारत देशास पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले. तरी सुध्दाय खबरदारी म्हाणुन ही मोहीम दरवर्षी राबविली जाते. पोलिओ लसीकरणापासून एकही बालक सुटू नये, त्यामुळे पोलिओला हद्दपार करण्यासाठी सर्वानी पुढे येण्याचे आवाहन आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी केले. रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत गाडगे बाबा समाधी मंदिर केंद्रावरील लसीकरणाचा शुभारंभ आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते बालकांना दोन थेंब जीवनाचे पाजण्यात आले. पोलिओ लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने योग्य व्यवस्था करण्यात आली होती. या बद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी प्रशंसा केली .पोलिओ पासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी सुयोग्य नियोजन करून मोहिमेला गती देण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी मनपा आरोग्य अधिकारी डॉ विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ सीमा नेताम, वैद्यकीय अधिकारी विक्रांत राजूरकर, जयश्री नांदुरकर, आदींसह आरोग्य कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *