अमरावती । चक्रपाणी कॉलनी -कॉटन ग्रीन कॉलनी येथे पायाभूत सुविधांच्या कामाचा शुभारंभ

  • रुपये ९६ लक्ष निधीतील विकास कामाचे आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन
  • नागरिकांनी आमदार महोद्यांन प्रति व्यक्त केले आभार

अमरावती २७ फेब्रुवारी : शहरातील प्रत्येक नागरीक हा शहरी क्षेत्राच्या विकासात्मक कामांच्या व कार्यप्रणालीच्या मध्यभागी असेल . नागरीकांचे हित, सुविधा लक्षात घेऊनच विकास कार्यक्रमाच्या पुर्ततेची अंमलबजावणी करणे याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. प्रभागा -प्रभागामध्ये सोई सुविधांची उपलब्धता करणे, शौक्षणिक सुविधांमध्ये गुणात्मक वाढ करणे, यासोबतच शहर स्वच्छ, हरीत व सुंदर करणे, रस्ते पाणी इत्यादी पायाभुत सुविधांची निर्मीती करणे अशा रचनात्मक कामांची पुर्तता करणे या करीता आपण जनशक्तीच्या आर्शीवाद व पाठबळाच्या सहाय्याने प्रयत्नरत आहोत. प्रामाणिकपणे व पारदर्शी पध्दतीने काम करण्याचा संकल्प घेवुन केल्या जाणा-या या प्रत्येक कार्याच्या पूर्ततेसाठी जनसामान्यांची साथ मोलाची ठरु पाहत आहे.असा विश्वास आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. मूलभूत सोयीसुविधा विशेष अनुदान निधी अंतर्गत तसेच आमदार निधी अंतर्गत स्थानिक परिसरात रुपये ९६लक्ष निधी अंतर्गत आता येथील विकास पर्वाला सुरवात झाली आहे नवसारी परीसर स्थित राजमंगल काॅलनी, रौनक रेसीडेन्सी, नॅशनल काॅलनी, रामकृष्ण परमहंस काॅलनी, श्रीमंगल कॉलनी ,कॉटन ग्रीन कॉलनी -पंचवटी काॅलनी, फ्रेंडस काॅलनी, येथील ओपन स्पेसचे चेनलिंग फेन्सिंग करणे, व रस्त्याचे डांबरीकरण, रस्त्याचे रुंदीकरण, अंतर्गत रस्त्याचे कारपेट सिलकोट करणे, ओपन स्पेसमध्ये वाॅकींग ट्रॅक तयार करणे या विकास कामांचे गुरुवार दिनांक 24 फेब्रु 2022 रोजी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली. दरम्यान नागरिकांनी आमदार सौ सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नागरिकांनी दिलेली साथ व व्यक्त केलेला विश्वास लक्षात घेता आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी प्राप्त झालेल्या निवेदनाचा स्वीकार करीत जनतेला अपेक्षेनुरूप विकास कार्यक्रम नियोजनबद्द पद्धतीने राबविला आहे. तदहेतू स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. खोडके दाम्पत्यांच्या पुढाकाराने शहरी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता जनतेशी थेट भेट -थेट संवाद साधण्यासह अधिकाधिक निधी उपलब्ध करीत शहरीक्षेत्र विकासाची संकल्पना राबविल्या जात आहे. आपल्या संबोधनात प्रशांत डवरे यांनी असे सांगितले.

या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे शहरअध्यक्ष तथा नगरसेवक – प्रशांत डवरे, नगरसेविका – निलीमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत महल्ले, गादे, कोल्हे, अरुणराव चौधरी, सेवानिवृत्त कर्नल गाले, हरणे, एल.जी. आडे, व्ही.डी. चारथड, डाॅ. ए.एस. निमकर, जि.एस.पाचे, एन.एस. सिनकर, एस.व्ही. सवई, ए.ए.टांक, एन.बी. मानकर, एम.यु. इंगोले, व्ही.के. खांडे, भोजराज काळे, नितिन भेटाळु, राजेश कोरडे, आकाश वडनेरकर, सुयोग तायडे, विशाल भगत, मिलिंद देशमुख, अविनाश डवरे, एन.एस. महल्ले, आकाश हिवसे, डाॅ. दिनेशकुमार सिनकर, विलास देठे, सागर डवरे, प्रियेश काळे, सुधिर मानकर, शरद पाटील, ज्ञानेश्वर निकम, सुदर्शन अडसोड, बाळुभाऊ काळे, श्रीकृष्ण गादे, धिरज गादे, राजाभाऊ महल्ले, सतिश क्षिरसागर, जयकृष्ण तायडे, अरुणराव खरबडे, प्रकाश सोनपरोते, तृणाल खरबडे, सुधाकर हेडाऊ, भैय्यासाहेब वानखडे, रामराव शेंडे, सुभाषराव डहाके, डि.डी. इंगोले, रमेश बिजवे, किशोर वानखडे, विनायक ठाकरे, प्रशांत सालपे, विशाल हेडाऊ, सुरेश सोनकुसरे, ज्ञानेश्वर चिकटे, खंडार साहेब, डाॅ. यशवंत देशमुख, डाॅ. अशोक हजारे, डाॅ. श्रीराम कोल्हे, संतोष सोरते, पुंडलीकराव हिवराळे, डि.डी. इंगोले, जि.एम. मालखेडे, बि.जि. बांबल, एस.पी. तायवाडे, भाष्कर बोंडे, संदीप वाकोडे, संजय नवरंगे, गजानन पागृत, आर.एस. चरपे, प्रदिप राऊत, उध्दवराव माहुलकर, बि.ए. गायगोले, एस.एस. शिरसाट, प्रभाकर तायडे, डाॅ. ए.एम.धर्मे, दिनेश चरपे, विलास देशमुख, बबनराव ढोले, आर.एस. मालसुरे, पि.एल. तडस, एस.बी. राऊत, योगेश नागरे, ऋषिकेश वैद्य, प्रथमेश बोके, पंकज शंकरपाळे, राजेंद्र कश्यप, सिध्दार्थ शेंडे, प्रदिप ढेरे, संजय तायवाडे, नरेंद्र भुगुल, दिपक ठाकरे, प्रतापराव देशमुख, दिनेश गोहाळ, संदीप वैद्य, राजेंद्र टाले, छोटु खंडारे, गजाननराव दहिलिंगे, प्रमोद धोटे, नागेश काळे, विलास काळे, अशोकराव जाधव, दिनेश बागल, शरद पाटील, गजानन बांबल, शंकरराव आसरे, मिलिंद मोरखडे, विशाल नालमवार, नरेंद्र विरुळकर, शंकर घोरपडे, डी.डी. इंगोले, डि.एस. बुटे, आर.एम. कोलते, श्रीमती अनुपमा देशमुख, सौ.रुपाली बहाळे, वर्षा लहाने, सुवर्णा इंगोले, उषा खांडे, सुनंदा जावळकर, शुभांगी अलोने, रुपाली निमकर, निता सोटे, शितल पाचे, उज्वला चारथळ, गायत्री आडे, ज्योती सिनकर, कांचन सिनकर, अनिता बोंडे, अरुणा शहा, स्वाती सवई, लिना डवरे, रश्मी टांक, उषा खरबडे, सविता काळे, दिप्ती बोंडे, रेखा मानकर, मंजु मानकर, अरुणा सोनपरोते, राजकन्या व-हाडे, उषा सोनकुसरे, मंजु गादे, पदमा अडसोड, प्रिया काळे, अपेक्षा वानखडे, मंदा फोपसे, जयश्री महल्ले, जया काळे, सिंधु शेंडे, श्रध्दा भोजने, कविता वंजारी, निलिमा दोरशेतवार, अनिता येवले, निशा भुईभार, स्वाती राऊत, मंजुषा वंजारी, भारती वंजार, सुषमा वसु, शितल दोरशेतवार, स्वाती मिलके, आशा मिलके, वैशाली भोकसे, स्वाती येवले, मंगला चरपे, आर.एस. फसाटे, शोभा विधळे, शारदा हरणे, डाॅ. उज्वला मोहोड, अलका कु-हेकर, कल्पना वैैद्य, दिपाली हरणे, सरोज वानखडे आदि सहीत स्थानिय परिसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनिंसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *