Amravati | जिल्हा परिषदच्या २८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हातील २६प्राथमिक व २ माध्यमिक शिक्षकांचा समावेश

शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक ३०मार्चला डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद मधिल २८शिक्षकांना सहपत्निक पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा हे होते, विशेष अतिथी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,प्रमुख अतिथी डायटचे प्राचार्य डाॅ. मिलिंद कुबडे,उप मु.का.अ.डाॅ.कैलास घोडके,समाज कल्याण अधिकारी राजेन्द्र जाधव,प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे,उप शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित होते.

यावेळी दोन वर्षाचे पुरस्कार वितरीत करण्यात आले.सन २०१९-२०मधिल अचलपूर बबलू कराडे, अमरावती शहाजहा परविन मो.याकुब, अंजनगाव सुर्जी वैशाली सरोदे, भातकुली लखन जाधव, चांदुर बाजार मंगेश वाघमारे, चांदुर रेल्वे मनोज वानखडे, चिखलदरा वैजनाथ इप्पर, धामणगाव उमेश आडे, दर्यापूर किशोर बुरघाटे, धारणी योगिता भुमर, मोर्शी प्रियंका काळे, नांदगाव खंडे. सचिन विटाळकर, वरुड नंदकिशोर पाटिल या प्राथमिक शिक्षकांचा समावेश असुन माध्यमिक विभागातुन अमरावती येथिल किशोर इंगळे यांचा तर सन २०२०-२१करीता प्राथमिक विभागातुन अंजनगाव सुर्जी मधुन मिलिंद भगत, अचलपूर कु.अलका भोपडे, अमरावती सरफराज खान हिदायत खान, चांदुर बाजार कु.सविता वासनकर, चिखलदरा पंकज वर्‍हेकर, तिवसा निलेश कांडलकर, दर्यापूर ज्ञानेश्वर सांगळे, धामणगाव देविदास राठोड, धारणी कु. योगिता जिरापूरे, नांदगाव खंडे. अंकुश गावंडे, मोर्शी मोहन निंघोट, वरुड धनराज टिकस यांची निवड झाली आहे. तर माध्यमिक विभागातुन अमरावती येथिल श्रीमती रेखा राऊत यांना स्मृतीचिन्ह,प्रमाणपञ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान,उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, गंगाधर मोहने, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक रामटेके, दिलिप तानोलकर, संगिता सोनोने मॅडम यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान यांनी तर सुञसंचालन वैशाली ढाकुलकर आणि आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *