आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सायलेंट इमर्जन्सी’ला उत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक

  • अमरावतीच्या अरण्य फाउंडेशनची प्रस्तुती
  • आदिवासी भागातील आरोग्य समस्येची मांडली वास्तविकता

मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या द्वितीय आंतरराष्ट्रीय सिनेमा फॉर स्क्रीन चित्रपट महोत्सव २०२२ स्पर्धेत अमरावतीच्या अरण्य फाउंडेशन प्रस्तुत‘सायलेंट इमर्जन्सी’ला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर संशोधन आधारित माहिती चित्रपट मेळघाट मधील आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित असून आदिवासीं महिला व बाल आरोग्याच्या हक्कांचे होत असलेले उल्लंघन व त्यांच्या मानवी हक्कांचे शासन-प्रशासन दरबारी होत असलेले हनन व उदासीनता, या व्यवस्थेला बळी पडलेले निरागस बालक आणि माता, कोरोना काळातील आदिवासींची भीषणता आणि जीवन जगण्याचा संघर्ष, गरोदर माता आणि बाल आरोग्य यांवर हा माहितीपट प्रकाश टाकतो. सिनेमा फॉर स्क्रीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एकूण २७ देशांतील ३७१ चित्रपटांचा समावेश होता, त्यापैकी ५० चित्रपट अंतिम टप्प्यात एकूण १८ विविध श्रेणीमध्ये वर्गवारी करण्यात आली. माहितीपटाच्या श्रेणीमध्ये अरण्य फाउंडेशन प्रस्तुत आणि डॉ. नितिन वसंतराव गणोरकर दिग्दर्शित ‘सायलेंट इमर्जन्सी’ला आणि अबंती सिन्हा यांच्या ‘भूम्चू’ द ड्रोप्स ऑफ ईटरनल लाईफ ला उत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक बहाल करण्यात आले. एकूण नऊ मिनिट चौतीस सेकंद लांबी असलेला ‘सायलेंट इमर्जन्सी’ माहितीपटाचे छायाचित्रण अर्जुन देशमुख यांनी केले, संपादन प्रबोधिनी टिप्रमवार, अर्थसहाय्य . निलिमा राऊत, सहाय्यक दिग्दर्शन . श्रेयस दिलीप पन्नासे तर क्रिएटिव्ह दिग्दर्शन ऋषिकेश खंबायत यांनी केले आहे.

सदर माहितीपट बनविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन पद्मश्री डॉ. रविंद्र देवराव कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता रविंद्र कोल्हे, डॉ. आशिष सातव (महान ट्रस्ट), खोज मेळघाटचे ऐडव्होकेट श्री. बंड्या साने आणि ऐडव्होकेट पौर्णिमा उपाध्याय, मेळघाटचे माजी आमदार श्री केवलराम काळे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान मुंबईचे प्राध्यापक डॉ. एच बेक आणि डॉ. अनिल सुतार, डॉ. वसंत आनंदराव गणोरकर, डॉ. जयनित मालविय, डॉ. मोनिका ढेवले, कु. राधिका पालिवाल, श्री. शशिकांत तभाने,डॉ. निशा स्वप्नील कांबळे, सौ. माधुरी नितिन गणोरकर, श्री. स्वप्नील सुनिल कांबळे यांचे लाभले. तर मोलाचे सहकार्य श्री अनिरुध्द वसंतराव राऊत, डॉ. संदिप मनोहरराव राऊत, श्री. दिलीप पन्नासे, सौ. जयश्री दिलीप पन्नासे, कु. श्रुतीकादिलीप पन्नासे तसेच अरण्य फाउंडेशनचे संस्थापक सभासदडॉ. मनोज नामदेवराव सपकाळ, सौ. शीतल सोनार,डॉ. मंजिरी सुपारे, डॉ. पूजा सावळे, डॉ. अर्पित निंभोरकर, मीनल मदनकर, राम गायकवाड, ऋतुजा हरणे, अभिषेक कात्रे, ऐश्वर्या लोंढे, अनिकेत अलासपुरकर, संचित तांबुस्कर, अदिती सैनी, वैभव धानोरकर, अल्फा गढवी, डॉ. सिमरन छाजेड, संकेत भोयर, तुषार गुंबळे, प्रा. सुयोग काटोले, प्रा. धनश्याम वाघमारे, प्रा. अंबरीश बोंबडे, वैभव भांबेरकर, हर्षल भांबेरकर, शंतनु पाटील, डॉ. कृष्ण गावंडे, प्रा. ईशान राजगुरे, डॉ. आदित्य खेरडे, सौरभ खेरडे, डॉ. अनुप रामटेके, डॉ. मनीषा पाटील, डॉ. मंगेश बुलगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *