महावितरचे खाजगीकरण होऊ देणार नाही – मा.आमदार बळवंतभाऊ वानखडे यांचे प्रतीपादन

अमरावती | आम्हि जोप्रयंत सत्तेत आहो तोप्रयंत महावितरण कंपनीचे खाजगीकरण होऊ देणार नाही असे प्रतीपादण दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान.बळवंतभाऊ वानखडे यांनी केले.ते महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेद्वारे अभियंता भवन शेगांव नाका अमरावती येथे 28 मे 2022 रोजी आयोजित केलेल्या परिमंडळ स्तरिय भव्य कामगार जाग्रुती मेळाव्याचे उदघाटन कळतांना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिमंडळ अध्यक्ष मान.अरविंद बोन्द्रे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र मजदुर युनियनचे केन्द्रीय उपाध्यक्ष मान.एन.बि.जारोंडे लाभले होते. यावेळी विचार मंचावर महापारेषण चे मुख्य अभियंता मान. बि.टि.राऊत श्री मती प्रतीक्षा शंभरकर कार्यकारी अभियंता अमरावती मंडळ संघटनेचे कार्याध्यक्ष मा.एस.के.हनवते प्रमुख संघटक मा.वाय.के.काबळे उपसरचिटनिस मा.संजय मोरे कोषाध्यक्ष जिवन गायकवाड प्रसिद्धी सचिव मा.बंडू शंभरकर महिला प्रतीनिधी जया चोपकर निशा चौधरी विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष मा.डि.जे.तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना मा.बळवंतभाऊ वानखडे म्हणाले राज्य शासनाच्या परवानगी शिवाय विद्युत क्षेत्रामध्ये कुठल्याही बदल होणार नाही. तो बदल राज्याच्या जनतेच्या आणी कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा नसेल तर तो होणार नाही अशि ग्वाही दिली.मागासवर्गीय शब्दामधेच संघर्ष दडलेला आहे या संघटनेचा इतीहास पाहिला तर संघर्ष करुनच या संघटनेने कर्मचाऱ्यांना न्याय मिळवुन दिला.विज उद्योगात टिकण्यासाठी या संघटनेचे पदाधिकारी आणी सभासद अहोरात्र झटत आहे असे ते म्हणाले मागासवर्गीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते शेवटी म्हणाले.

प्रमुख मार्गदर्शन करतांना मा.एन.बि.जारोंडे म्हणाले पावसाळ्यात गडुळ होणाऱ्या पाण्याला शुउ करण्यासाठी जशी फिल्टरची आवश्यक असते तशिच विचारावरिल जळकट दुर करण्यासाठी विचार शुद्ध करण्यासाठी अशा जाग्रुती मेळाव्याची गरज असते.महावितरण हि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे आणी ती सरकारच्या मालकीची आहेहि कंपनी खाजगी म्हणून तिची पध्दतशीर पणे बदनामी करण्याचा प्रयत्न इथले प्रतीगामी करत आहे.महावितरण मधे स म्हणून अनेक प्रयत्न होत आहे. त्याला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सभासद हाणुन पाडत आहे त्यांमुळे संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न इथले प्रतीनिधी करत आहे.

खरे तर विज उद्योग हा सरकारच्या मालकिचा असावा.अशि मांडणी बाबासाहेबांनी केली होती.कारण हि चैनीची वस्तू नाही. तर गरज आहे त्यांच्या विचारावर चालणारी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना विज उद्योगाचे कधिही खाजगीकरण होऊ देणार नाही. प्रश्न निर्माण होतात तज सुटतात पुन्हा नविन प्रश्न निमार्ण होतात हि प्रर्क्रिया आहे परंतु कामगार चळवळीत चागले विचार महत्त्वाचे आहेत पुढिल वाटचाली मध्ये संघटन असेच मजबूत करावे असे आव्हान शेवटी त्यांनी केले.मा.एस.के.हनवते आटले विचार मांडताना म्हणाले आर्थिक दूष्ट्या बिकट परिस्थितीतुन जात आहेत्यावर मात करण्यासाठी संघटनेचे सभासद अहोरात्र मेहनत करत आहे हा उद्योग टिकला तरच आपण टिकु हे त्यांना माहित आहे परंतु काही प्रतीगामी संघटना महावितरण ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.अनुकंपा तत्वावरिल जवळपास दोन हजार प्रकरणे प्रलंबित आहे यात विद्युत अपघाताची प्रकरचे अनेक आहेत हि प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे काम करत असतांना कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा पुरेपुर वापर केला पाहिजे कारण आपले कुटुंब आपल्यावर अवलंबून असते मागासवर्गीय संघटना हि वैचारिक दुष्ट्या असणारी संघटना आहे त्यामूळे कार्यकरतांनी प्रश्न सोडवत असतांना अभ्यासपुर्ण मांडणी करावी असे ते शेवटि म्हणाले. जाग्रुती मेळाव्याला वाय.के.काबळे संजय मोरे बि.टि.राऊत जिवन गायकवाड बंडू शंभरकर जया चोपकर निशा चौधरी प्रतिक्षा शंभरकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी संघटनेतर्फे सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच नविन सभासदांचा सुध्दा सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिमंडळ कार्याध्यक्ष मा.राहुल सांभारे यांनी केले तर सुत्रसंचालन परिमंडळ सचिव रोशन बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.जयराज गजभिये यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.धनंजय दामोदर मंडळ अध्यक्ष हर्षपाल सावतकर मंडळ सचिव प्रविण डाखोडे परिमंडळ कोषाध्यक्ष दिपक हांडे उपाध्यक्ष मा.विशाल कांबळे मडळ अध्यक्ष उमेश गावंडे मडळ सचिव यवतमाळ मिलिंद भगत देवराज मेश्राम संदिप गजभे विशाल सिरसाट प्रसाद इंगळे स्वनिल चौधरी अमोल बोंडसे प्रशांत तायडे सोळंके रामटेके महापारेषण यांनी विषेश परिक्षम घेतले कार्यक्रम माला अमरावती महावितरण व महापारेषण परिमंडळातील हजारे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *