अमरावती | महेंद्र कॉलनी प्रभागातील असीर कॉलनी मनपा दवाखाना रुग्णसेवेसाठी सज्ज

  • आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी घेतला सेवा सुविधांचा आढावा
  • अमरावतीच्या आरोग्य सेवेला मिळणार बळकटी – आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती २९ मे : अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ सौ . सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून अखेर गेल्या कित्येक वर्षांपासून बंदावस्थेत असलेला महानगर पालिकेचा असीर कॉलनी दवाखाना आता रुग्ण सेवेत सज्ज झाला आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता या रुग्णालयात साथरोग निवारणार्थ प्रभावी उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्याला घेऊन तसेच आगामी दिवसात लवकरच येथे सूतिका गृह सुरु करण्याबाबतचे सुयोग्य नियोजन व आरोग्य सेवा सुविधांसंदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी असीर कॉलनी मनपा दवाखाना येथे प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

अमरावती शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहराच्या मध्य भागात असलेले रुग्णालय लांब पडत आहे. त्यामुळे शहरांतर्गत मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सुविधा निर्माण करून येथील वैद्यकीय सेवा अधिक वृद्दींगत करण्यावर आ. सुलभाताई खोडके यांच्या द्वारे सातत्यपूर्ण भर दिला जात आहे. अशातच महेंद्र कॉलनी प्रभागातील असीर कॉलनी मनपा दवाखान्याची परिपूर्ण बांधकाम असलेली इमारत ही बंद अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती. या इमारतीत स्थानिक परिसरवासीयांकरिता प्राथमिक रुग्णालय व सूतीकागृह उभारून आरोग्य सेवा उपलब्ध करण्याला घेऊन आ.सुलभाताई खोडके यांनी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला . सदर निधी मनपाला प्राप्त होताच तेथील स्थापत्य व विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. यासह मेडिकल संसाधने, फर्निचर ची सुद्धा दवाखान्यात उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा दवाखाना लवकरात लवकर रुग्णसेवेत कार्यान्वित करावा अशी सूचना आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आली. मनपाच्या असीर कॉलनी सूतिकागृह रुग्ण सेवेत सुरु करण्यास सज्ज असून सुरुवातीला या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात येईल , ज्यामध्ये गरोदर माता तपासणी, बालरोग व जनरल मेडिकलची सुविधांची उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ . विशाल काळे यांनी दिली. दरम्यान आमदार महोदयांनी दवाखान्यातील नोंदणी विभाग, औषध वितरण कक्ष, इंजेक्शन व रक्त नमुने तपासणी कक्ष, स्टाफ रूम, माता व नवजात बाळ केअर युनिट, स्वच्छता विषयक बाबींची पाहणी केली. तसेच सर्व सोयी सुविधांनी आसिर कॉलनी मनपा दवाखाना सज्ज असल्याबाबत समाधान व्यक्त केले. दवाखान्याच्या आवारात काही किरकोळ कामे बाकी असल्याने ती कामे गतीने पूर्ण करण्यात यावी, रुग्ण व नातेवाईकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा म्ह्णून मजीप्रा कडून पाईप लाईन टाकण्याचे प्रयोजन करावे, लगतच असलेल्या लोकवस्तीमधील सांडपाणी दवाखान्याच्या आवारात शिरू नये यासाठी अंडरग्राऊंड पाईप टाकून पाण्याचा योग्य निचरा करावा, परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात याव्यात, आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई महत्वाची असून स्वच्छता विषयक कामांचे नियोजन करावे, परिसरात सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड, करून रुग्णांना बसण्यासाठी बाक लावण्यात यावेत, दिव्यांग रुग्णांना सुविधा होईल म्हणून व्हील चेअर, स्ट्रेचर ची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आल्या.

असीर कॉलनी मनपा दवाखाना परिसरातील खुली जागा शॉपिंग मॉल साठी आरक्षित आहे. या जागेचा वापर सुद्धा पार्किंग , ऍम्ब्युलन्स उभ्या करण्यासाठी , तसेच परिसरसात गार्डन साठी होऊन शकतो , त्यामुळे सदर शॉपिंग मॉल ची जागा दवाखान्याच्या बहुउद्देशीय कामांकरिता हस्तांतरित करण्याबाबत मनपा आरोग्य विभागाने एडीटीपी कडे प्रस्ताव सादर करून कार्यवाही करावी, अशी सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, विभागीय समन्वयक, विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, शहराध्यक्ष प्रशांत डवरे,माजी महापौर ऍड. किशोर शेळके, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय माजी अधिष्ठाता तथा विद्यमान संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत राजूरकर, यश खोडके, मनपा उपअभियंता प्रमोद इंगोले , जयंत काळमेघ , मुख्य औषधी निर्माता धीरज माकोडे, औषधी निर्माता अविनाश खापर्डे, मोहम्मद शाहिद,सनाउल्ला खान ठेकेदार,हबीब खान ठेकेदार, सनाउल्ला सर, गाजी जहरोश, सय्यद साबीर, नईम भाई चुडीवाले, नदीम मुल्ला सर, समी पठाण, फारुखभाई मंडपवाले, अफसर बेग,अतिब खान, साजिदभाई, दिलबर शाह, ऍड. शब्बीर भाई, अबरार साबीर हाजी रफिक सेठ, काझी आहद अली, नुरुभाई टीटी, मोहम्मद जफर भाई शाह, मोहम्मद इनाम, मुख्तार अहमद, मोईन खान, संजय बोबडे, राजेश कोरडे, महेंद्र सोमवंशी, गोपाल चिखलकर,छायाचित्रकार महेन्द्र किल्लेकर, आदींसहित अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

रुग्णांना मिळणार आरोग्य संजीवनी
” कोरोना काळ संपल्याने आता अन्य आजार , साथरोग , महिला आरोग्य यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने आता आरोग्य सुविधांच्या कक्षा विस्तारून रुग्ण सेवा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न आहे. मनपाचा असीर कॉलनी दवाखाना सुरु होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन रुग्णालय व इतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडणारा भार कमी होईल, तसेच महेंद्र कॉलनी, नवसारी, वलगाव रोड मार्गावरील रहिवासी क्षेत्रातील नागरिक, तसेच आसपासच्या खेडेगाव चांगपूर, कुंड सर्जापूर, वलगाव, रेवसा येथील ग्रामस्थांना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार असून अमरावतीच्या आरोग्य सेवेतही भर पडणार आहे. ”
सौ. सुलभाताई संजय खोडके, आमदार अमरावती विधानसभा मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *