शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, लाखोंचे नुकसान; बुलडाणा शहरातील घटना…

बुलडाणा – शहरातील शिवनेरी नगरातील काशिनाथबाबा मठा जवळील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग आज सकाळी लागली. या आगीत लाखों रुपयांचे साहित्य जवळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवीतहानी टळली. या आगीमुळे साडेतीन लाखा रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवनेरी नगरी नगरातील काशिनाथबाबा मठा जवळ मंगेश सोनटक्के यांचे घर आहे. आज सकाळी मंगेश सोनटक्के हे कामानीमीत्त चिखली येथे गेले होते. घरात कोनीही नसतांना अचानक शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. घरातून धुर निघत असल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरीकांनी अग्निमशन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली.

अग्निशमन दलाचे जवान आणि येथील नागरीकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. ही आग इतकी भयावह होती की, घरपयोगी वस्तु जळून खाक झाले. घरातील फ्रीज, एलईडी टीव्ही, घरातील पैसे, धान्य, संसारपयोगी वस्तू जाळून खाक झाले आहे. असे असले तरी यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु आगीत जवळपास साडेतीन लाखा रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *