निम्न पेढी प्रकल्पाच्या संपादित क्षेत्रात रेती खणन; रेती अवैध उत्खननप्रकरणी उपअभियंत्याला ३१ कोटींचा दंड

भातकुली तहसीलदारांचे आदेश

भातकुली : तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीतून १५,४९६.९६ ब्रास रेतीचे उत्खननाप्रकरणी निम्न पेढीचे उपअभियंता यांच्यावर ३१,९२,३७,३७६ रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली. तसे आदेश भातकुलीच्या तहसीलदार नीता लबडे यांनी मंगळवारी दिले. सात दिवसांच्या आत या रकमेचा शासकीय खजिन्यात भरणा न केल्यास महसुलाची थकबाकी म्हणून सक्तीची वसुली करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

प्रकारची कारवाई होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. निम्न पेढी प्रकल्पाच्या मौजा बोंडेवाडी येथील शेत सर्व्हे नंबर ४७ व ४८ व मौजे सरबलमपूर येथील शेत सर्व्हे क्रमांक ८४ व ८५ येथून १५,४९६ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक झालेली असल्याचे चौकशी अहवालातून सिद्ध झाले आहे, त्यामुळे निम्न पेढी प्रकल्पाचे उपअभियंता यांच्यावर ३०,९९,३९,२०० रुपयांचा दंड व ९२,९८, १७६ रुपयांची रॉयल्टी असे एकूण ३१,९२,३७,३७६ रुपयांची आकारणी करण्यात आली आहे.

‘महसूल’ची परवानगी नाही

एसडीओ नितीन व्यवहारे व जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख यांनी भेट देऊन पाहणी केली, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी देखील चौकशी अहवाल सादर केला, याशिवाय बुडीत क्षेत्रातील उत्खननाबाबत महसूलची परवानगी नसल्याची बाब तहसीलदार यांनी स्पष्ट केली.

अधिकार निम्न पेढी विभागास नसल्याबाबतचे त्यांनी तहसीलदार कार्यालयास कळविले आहे. मात्र पेढी प्रकल्पाद्वारा संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रातून जर हा प्रकार होत आहे त्यावर कारवाई करण्याकरिता महसूल विभागास अवगत करणे आवश्यक असल्याचे मत तहसीलदार माहिती घेतल्यानंतर यांच्याद्वारा नोंदविण्यात आले आहे. असल्याचे सांगितले.

संयुक्त समितीच्या चौकशीनंतर कारवाई

भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, बी अँड सीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी यांची समिती ९ जूनला गठित करण्यात आली. चौकशीअंती अहवालात ३१ कोटींचे उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. किंबहुना याच मुद्द्यावरुनच या विभागाला धारेवर धरण्यात आलेले आहे व या सर्व प्रकाराला मूक संमती असल्यानेच हा एवढा मोठा प्रकार तालुक्यात घडला असावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *