अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विधवा महिलांकरीता १०,००० रुपये आर्थिक सहाय्य

  • गरजू विधवा महिलांना मिळणार मोठा आधार
  • मनपा प्रशासक डॉ. प्रविण आष्‍टीकर यांनी दिली अनुदान योजनेला मान्यता

अमरावती महानगरपालिका अंतर्गत शहरातील नाग‍रीकांकरीता मुलभूत सोई सुविधांसोबत विविध सामाजिक कल्‍याणकारी योजना राबविल्‍या जात असतात. त्‍याचाच एक भाग म्‍हणून शहरातील विधवा महिलांना लाभ व्‍हावा या सामाजिक संकल्‍पनेतून अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील १८ ते ५५ या वयोगटातील विधवा (एकल) महिलांना आधार म्‍हणून एकदाच १०,००० रुपये आर्थिक सहाय्य व अनुदान देण्‍याबाबत योजनेस मा.आयुक्‍त तथा प्रशासक यांनी पुढाकार घेवुन यास मान्‍यता दिलेली आहे.

सदर योजना अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विधवा महिलांकरीता असून या योजनेच्‍या सर्वसाधारण अटी म्‍हणजे अर्जदार हा अमरावती शहराचा रहिवाशी असावा. अर्जदाराने विहित नमुन्‍यातील अर्ज मुदतीत सादर करणे आवश्‍यक, पतीचा मृत्‍यु पुरावा, अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष ज्‍या महिलेचे वय ५५ वर्षापेक्षा जास्‍त असेल परंतु त्‍यांच्‍या सर्वात लहान मुलाचे वय २० वर्षापेक्षा कमी असेल अशी महिला सुध्‍दा पात्र राहु शकेल. आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल असलेल्‍या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा महिलेंचे बॅंक खाते असणे अनिवार्य आहे.

विधवा (एकल) महिलांना त्‍यांचे मुलांचा व कुटूंबाचा उदर निर्वाहाकरीता मदत होवुन सामाजिक सुरक्षा निर्माण व्‍हावी तसेच स्‍वत:च्‍या पायावर उभे राहण्‍याकरीता घरगुती उद्योगास सहाय्य व्‍हावे या उद्देशाने योजना तयार करण्‍यात आली आहे. अमरावती महानगरपालिका द्वारा १०,००० रुपये अनुदानाचा लाभ अंदाजे ४०० महिलांना देण्‍याचे नियोजन आहे. योजनेचा लाभ मिळण्‍याकरीता आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज महानगरपालिका, महिला व बालविकास विभागामध्‍ये करावा लागेल. गरजु व पात्र लाभार्थ्‍यांचे खात्‍यात थेट आर्थिक लाभ या योजनेतुन होणार आहे. लवकरच याबाबतीत अंमलबजावणी सुरु करुन गरजुंना या योजनेचा लाभ देण्‍याचे मा.आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी नियोजन केलेले आहे. विशेषत: कोविडमुळे विधवा महिलांना याचा मोठा आधार राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *