नाशिक । ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करा अन्यथा निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून जेष्ठ नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली कि, ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना रुपये ३००० पेन्शन लागू करा. भूमिहीन शेतकरी, शेतमजूर ज्यांच्या कडे काहीच शेती नाही असे मोठ्या प्रमाणात नागरिक गावामध्ये हलाकीचं जीवन जगत आहेत, अश्याना मोदी सरकारकडून कुठलीही मदत अद्याप पर्यंत मिळालेली नाही.

जेष्ठ नागरिकांना उतरत्या वयात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, अश्यात जर त्यांच्या कडे जगण्याचं साधन नसेल तर त्यांनी करावं तरी काय, जेष्ठांना जगण्यासाठी एक आधार म्हणून त्यांना किमान पेन्शन तरी लागू करावी अशी आर्त हाक येथील जेष्ठ नागरिक जनजागृती संघटनांकडून होत आहे.

जेष्ठ नागरिकांना त्वरित पेन्शन लागू करावी किंवा जेष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना निधी मंजूर करावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये जेष्ठ नागरिक मतदान करणार नसल्याचा इशाराही येथील जेष्ठ नागरिकांकडून मोदी सरकारला देण्यात आला आहे. अशी माहिती सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील जेष्ठ नागरिक जनजागृती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सैनिक सुरेश सीताराम बोरसे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *