अल्पसंख्यांक बहुल भागात वाढत आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद, हैदरपूरा – मद्रासी बाबा नगर येथील ५५ कार्यकर्त्यांचा राष्ट्रावादीत प्रवेश

विभागीय समन्वयक संजय खोडके यांच्या नेतृत्वावर दर्शविला विश्वास

अमरावती २८ ऑक्टोबर : अमरावती विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन वाढविण्यासह पक्ष बांधणीला घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता संजय खोडके यांच्यावर पक्षाने अमरावती विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वात आता विभागातील अनेक कार्यकर्ते व युवक बांधव, नागरिक व सर्व समाजघटक एकवटल्या जात असल्याने अमरावतीत राष्ट्रवादी पक्ष नव्या जोमाने भरारी घेत आहे. तर अल्पसंख्यांक बहुल भागात पक्षाची ताकद वाढत असून स्थानिक बूथ शाखांचे सुद्धा गठन करण्यात येत आहे. अशातच अमरावती स्थित हैदरपूरा – मद्रासी बाबा नगर येथील जवळपास ५५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी त्यांना पक्षाचा दुपट्टा व नियुक्ती पत्र देऊन सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हाजी रफिक भाई, ब्लॉक अध्यक्ष प्रा. सनाउल्ला खान सर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वहीद इन्कलाब, गाजी जाहेरोश सर, अब्दुल सत्तार राराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

देशाचे सर्वोच्च नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उर्जास्थान माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेकडे शेतकरी , कामगार , मजूर , बहुजन , अल्पसंख्यांक नागरिक तसेच सर्व समावेशक जनता अधिक आकर्षित होत असून युवा वर्ग ,महिला वर्ग सुद्धा राष्ट्रवादी कडे वळत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक बळकट असली तरी अमरावतीत पक्षाची स्थिती चांगली नाही , त्यामुळे पक्ष बांधणीला घेऊन आपल्यावर जबाबदारी देण्यात आल्याने सर्व स्तरातील जनतेला पक्षात काम करण्याची संधी देण्याला आपली प्राथमिकता असल्याचे मनोगत समन्वयक संजय खोडके यांनी व्यक्त केले . कोरोना काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा महाराष्टाचे लोकनेते अजितदादा पवार यांनी राज्याला विकासाची नवी दिशा देण्याचे काम केले . त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे राज्याची विस्कटलेली स्थिती पूर्वपदावर येऊन अर्थ चक्राला गती मिळाली . अजितदादांचे नेतृत्व हे महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या क्षितिजाकडे नेणारे असल्याने राष्ट्रवादीचे धर्मनिरपेक्ष धोरण व पुरोगामी विचार समाजात रुजविण्यासाठी आता सर्व समाज घटकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ,प्रवक्ता ,तथा विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी केले . आता तत्पूर्वी आपल्या संबोधनात शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी अमरावती मनपा मधली पक्षाची मागील १० वर्षातील स्थिती बाबत विश्लेषण केले. आगामी निवडणुकीत मनपा काबीज करायची असल्याने आता नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन प्रशांत डवरे यांनी केले . यावेळी गाजी जाहेरोश सर , अब्दुल सत्तार राराणी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.

दरम्यान राष्ट्रवादीचे वार्ड अध्यक्ष म्हणून हसन खान अजीम खान, मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ, मेहबूब शाह अमीर शाह, अब्दुल शोएब अब्दुल तालिब, युनूस खान नजीर खान यांची नियुक्ती देखील करण्यात आली. तर हैदरपूरा – मद्रासी बाबा नगर येथील जहिरोद्दीन कुदबोद्दीन, सादिक शाह मेहमूद शाह, नशीब खान हुसेन खान, अब्दुल मजीद अब्दुल सत्तार राराणी, शेख रशीद शेख कासम, मोहम्मद जाकीर मोहम्मद इब्राहिम, अब्दुल कदीर अब्दुल कादर कुरेशी, दाऊद शाह याकूब शाह, मोहम्मद रियाज अब्दुल सत्तार, अब्दुल कदीर शेख करीम , अब्दुल मुतलीब अब्दुल रफिक, मो. सईद मो. इब्राहीम, अमीन शाह हनिफ शाह, मो. इर्शाद मो. युनुस, अ. राजीक अ. खालिख, मोहम्मद अजिम मो. हाशम, मो. अनिस मो. युसुफ पेटल, अ. हाफिज अ. मजद, सादीक शाह दिलावर शाह, अ. हाफीज अ. अजीज, अझरोद्दीन भाई, सादीक खान हनिफ खान, आरिफ खान हसन खान, शे. युसुफ शे. हुसेन, मो. सलीम अब्दुल बशीर, मो. याकुब मो. अकबर, कौसर खान आबीद खान, युनुस खान नजीर खान, सै. जमील सै. कादर , अ. नासीर अ. बशीर, बिस्मील्लाह खाँ भाई, नजीर अहमद खान हबीब खान, शे. रहीम शेख मोहम्मद, करामत अली मनवर अली, नासीर खान इब्राहीम खान, सत्तार शाह नबी शाह, शेख जमील शे. जुम्मन, अब्दुल सत्तार शेख हातम, मो. इस्माईल रारानी, मो. साकिब शेख नासीर, इमरान खान रऊफ खान, मो. अदनान अ. नासिर, मो. कैफ शेख कलीम, मो. नाजीम मो. सादीक, अ.शकील अ.रशीद, अब्दुल हमीद शेख छोटू, शेख रहमान शेख सरदार, अब्दुल वाजीद अ. सादीक, अब्दुल वाजिद अब्दुल खालिद, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमाचे संचालन ब्लॉक अध्यक्ष प्रा. सनाउल्ला खान सर व आभार प्रदर्शन शहर महासचिव नदीमउल्ला सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *