SOLAPUR | ‘इंडोमेट्रीओसिस’ या आजाराची जनजागृती करणारे अनोखे चित्र प्रदर्शन

जगभरातील 19 कोटिहून अधिक महिला बाधित असणाऱ्या ‘इंडोमेट्रीओसिस’ या आजाराची जनजागृती करणारे अनोखे चित्र प्रदर्शन सोलापुरात भरलं आहे.
महिलांच गर्भाशय आणि मासिक पाळीशी संबंधित असणाऱ्या या जीवघेण्या आजाराबाबत आपल्या देशात म्हणावी तितकी जगारूकता नाही आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात आणि प्रसूतीतज्ञ डॉ. संदेश कादे यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील फडकुळे सभागृहामध्ये हे अनोखा चित्र प्रदर्शन भरावण्यात आलं आहे.
हे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 22 जिल्ह्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.या चित्रांच प्रदर्शन लवकरच दुबईमध्ये देखील केल जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *