59 केंद्रावर पार पडली एमपीएससी ची पूर्व परीक्षा

अमरावती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आज रविवार, ३० एप्रिल रोजी शहरातील ५९ केंद्रांवर सकाळी ११ ते १२ वाजताच्या कालावधीत आयोगाच्या अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आल्या जिल्ह्यात १७ हजार ९२८ उमेदवार या परीक्षेला प्रविष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.


परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी 1 हजार 780 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.सुमारे ८ हजार १६९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये सहाय्यक कर अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, श्रेणी १, मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदांकरिता परीक्षा घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *