AMRAVATI | वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागाची आमदार प्रताप अडसड यांनी केली पाहणी

काल मध्यरात्री पासून धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे या तालुक्यातील सावंगी मग्रापूर रात्री एक ते दोन च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाडे मोडून पडले तर बऱ्याच घरांची छप्पर सुद्धा उडून गेली. घरांची पडझड व घरावरील पत्रे उडून घरामधील राहणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर मोठे मोठे दगड सुद्धा पडण्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. त्याच बरोबर गावामधील इलेक्ट्रिक पोल सुद्धा पडला असून घरात साठवलेले सोयाबीन , गहु ,तुरी किराणा व घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे पूर्णतः नुकसान व भिजून गेलेले आढळून आले.

यावेळी काही नुकसान ग्रस्त महिला मंडळींनी शासनाकडे मदतीची हाक व आमच्या गावी घरकुल नसल्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर घरकुलची सुद्धा सुविधा करून देण्यात यावी असे व्यक्त केले आहे. यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली असता. सावंगी मग्रापुर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तहसीलदार, नायब तहसीलदार,पटवारी, कोतवाल यांच्यासह नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसान झालेल्या भागात शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यावेळी त्यांनी प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *