प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटविण्याकरिता पक्षकारांनी नोंदवला राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सहभाग

दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व खंडपीठे,सर्व जिल्हा न्यायालये,तालुका न्यायालये,कौंटूंबिक न्यायालये,इतर न्यायालये व न्यायाधिकरणे येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशानवये रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले. याकरीता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तर्फे सुद्धा आवाहनही करण्यात आले होते. न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठेवण्याकरिता रविवारी न्याय मंदिरात संबंधितांचे वतीने आपली प्रकरणे व त्याची विस्तृतपणे माहितीचे दस्तावेज घेऊन अनेक पक्षकारांनी रीतसर अर्ज करीत या लोकअदालत मध्ये सहभाग नोंदवला असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमरावती माननीय एम. आर. देशपांडे आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती जी. आर. पाटील यांच्या वतीने यादरम्यान पक्षकारांशी संवाद साधित त्यांना यावेळी यथोचित मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पक्षकारांना त्यांची प्रकरणे आपसी तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्याकरिता त्यांना न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ अर्थातच पॅनल च्या वतीने मदत करण्यात आली. याकरिता पक्षकारांना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त शुल्क म्हणजेच फी चा भरणा करावा लागला नाही. यासोबतच अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयात व अन्य न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करीत शहरी व ग्रामीण भागातील पक्षकारांनी अर्ज करीत सहभाग नोंदवला होता. यावेळी बँक वसुली प्रकरणे,कामगार वाद प्रकरणे,वीज व पाणी देयकाबाबतची प्रकरणे,( तडजोडीस अपात्र प्रकरणे वगळून ), तसेच इतर फौजदारी तडजोडपात्र , वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे,फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे,अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे,वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे,नोकरी बाबतची प्रकरणे ज्यात पगार व इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे फायदे,महसूल बाबतची प्रकरणे ( जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात प्रलनबीत असलेली प्रकरणे,इतर दिवाणी प्रकरणे( भाडे,सुविधाधिकार बाबतचे हक्क,हुकुमाबाबतची प्रकरणे,विनिर्दिष्ट पालन प्रकरणे इत्यादी प्रकरणांना घेऊन पक्षकारांना यावेळी न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते अर्थातच पॅनलच्या वतीने मदत करण्यात आली. परस्परातील वादांना पूर्णविराम देण्यासाठी सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनविण्यासाठी लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊन वाद मिटविण्याकरिता राष्ट्रीय लोकअदालत च्या माध्यमातून चालून आलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी शिस्तबद्ध व उचितपणे आयोजित या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये सहभाग नोंदवत आपली प्रकरणे निकाली काढण्याकरिता एकच पर्याय म्हणजे लोकअदालत चा मार्ग सर्वोत्तम असा सूर यावेळी उपस्थित पक्षकारांमध्ये दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *