आंबेकरी संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे आमदार सुलभाताई खोडके यांचा सत्कार व अभिनंदन

विधिमंडळात उचलला होता इर्विन चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागा हस्तांतरणाचा मुद्दा

अमरावती ३० जुलै : अमरावती शहराच्या विविध सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान व तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या इर्विन चौक स्थित महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्मारकाच्या जागा हस्तानंतरणाचा मुद्दा वर्ष २०१६ पासून प्रलंबित आहे. जागा हस्तांतरणाला घेऊन आंबेडकरी अनुयायांचा लढा सुरु असतांना अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागा हस्तांतरण प्रकरणी मुद्दा उपस्थित केला. शासनाने उच्च न्यायालयात स्पेशल कौंसिल ( विशेष अधिवक्ता) नेमण्यात यावा व या संदर्भातील निकाल आपल्या बाजूने लावून घ्यावा, अशी भूमिका राज्य विधिमंडळात मांडली. या बद्दल शहरातील आंबेडकरी संघटनाच्या शिष्टमंडळाने त्यांचा सौहार्दपूर्वक सत्कार करीत अभिनंदन केले आहे.
इर्विन चौक स्थित डॉ. बाबा साहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसराचे सौंदर्यीकरणासाठी पुतळ्या मागील खाजगी जागेच्या हस्तांतरण संदर्भात अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार या नात्याने सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सद्यास्थित सुरु असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. सद्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणात सरकारने स्पेशल कौन्सिल ( विशेष अधिवक्ता ) ची नेमणूक करून हा निकाल आपल्या बाजूने लावून घ्यावा, अशी मागणी करीत व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्या संदर्भात उर्वरित जागेची रक्कम शासन अदा करणार का? असा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते .

या संदर्भात महापालिकेनेठराव पारित करून खाजगी जागेच्या भूसंपदासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कडे जवळपास ३.३९ कोटी रुपये जमा केले आहे . मात्र खासगी जागा मालकाने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सदर प्रकरणात २४-६-२०२३ रोजी न्यायालयाने जैसे -थे चे आदेश दिले असल्या कारणाने पुतळा परिसरात कोणतेही स्मारक वा सौंदर्यीकरण करण्याचा मार्ग दुरापास्त झाला आहे .

दरवर्षी आंबेडकर जयंती, महापरीनिर्वाण दिवशी या ठिकाणी महामानवास अभिवादनासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायांची गर्दी होत असते. तसेच अनेक आंदोलनाची सुरुवात येथून होत असून अमरावतीत आलेले मोठे राजकीय पुढारी देखील पुतळ्याला भेट देऊन अभिवादन करतात. त्यामुळे सदर ठिकाण हे अनेक सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्रस्थान व अनुयायांचे श्रद्धास्थान बनले आहे. या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची सर्वांची इच्छा आहे. मात्र खाजगी जागा हस्तांतरण प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत प्रतीक्षा वाढली आहे. याबाबत आमदार महोदयांनी राज्य पावसाळी अधिवेशनाच्या गेल्या २६ जुलै २०२३ रोजीच्या कामकाजा दरम्यान मुद्दा उपस्थित केला होता . तसेच तसेच ३१ जुलैला या प्रकरणा संदर्भात कोर्टात सुनावणी असल्याने शासनाच्या वतीने स्पेशल कौंसिल ( विशेष अधिवक्ता ) उभा करणार का ? व हा निकाल आपल्या बाजूने लावून घेणार का ? असा प्रश्न लावून धरला. तसेच या खासगी जागेचा वापर डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी म्हणजेच सार्वजनिक प्रयोजनार्थ असल्याने यामध्ये खाजगी जागा मालक यावर सुद्धा अन्याय होणार नाही म्हणून योग्य वाटाघाटी व्हावी, व जागेची उर्वरित रक्कम शासनाने द्यावी, अशी लक्षवेधी मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी लावून धरली होती. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऍडव्होकेट जनरल यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संदर्भात जागा हस्तांतरण संदर्भात निर्माण झालेला गुंता सुटणार असल्याचे दिसत आहे. अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज अधिवेशनात बुलंद केल्याने आता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संदर्भात जागा हस्तांतरण संदर्भातील आंदोलनाला यश मिळत असल्याचे दिसत आहे. याबद्दल शहरातील विविध आंबेडकरी पक्ष व संघटनाच्या शिष्टमंडळाने त्यांचा सौहार्दपूर्वक सत्कार करीत अभिनंदन केले आहे. पुतळ्याच्या संदर्भात यावेळी शिष्ट मंडळाने राष्ट्रवादी काँगेसचे नेते संजय खोडके यांच्याशी चर्चा केली असता या परिसरात लौकिकाला साजेल असे सौदर्यीकरण व्हावे व अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त रामेश्वर अभ्यंकर, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, भूषण बनसोड,मधुकरराव शृंगारे, विजय रामटेके,माजी सरपंच- विनोद भालेराव,संजय महाजन,विश्वास वानखडे,बापूराव भोवते,दिलीप गेडाम,दिलीप अटाळकर, नंदेश्वर ढोके,सिद्धार्थ राऊत,भीमराव वानखडे,प्रवीण सरोदे,अशोक वासनिक,राजरत्न हरणे,संजय गायकवाड, विश्वनाथ सदांशीवे, विकी वानखडे आदींसह आंबेडकरी चळवळीतील गणामान्य मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या अपॆक्षित व अनुरूप स्मारक उभारू – आ. सौं. सुलभाताई खोडके

इर्विन चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक जागा हस्तांतरण प्रकरणात आज ३१ जुलै ला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी मला आशा आहे. जागेचा प्रश्न मिटल्यास शहराचा मुख्य चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा सौंदर्यीकरणासाठी सर्व आंबेडकरी संघटनाचे कार्यकर्ते यांचे एकमत करून आंबेडकरी जनतेला अपेक्षित व अनुरूप असे स्मारक आपण साकारू. यासाठी एक चांगला आर्किटेक नेमून सर्व डिझाईन तयार करून संपूर्ण जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक साकारण्या संदर्भात पुढाकार घेणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारे व लौकिकास साजेल. असे स्मारक घडविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास आ. सौं. सुलभाताई खोडके यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *