श्रावण महिन्यानिमित्त यवतमाळचे प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर फुलांनी सजले

श्रावण महिन्यानिमित्त यवतमाळचे प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर फुलांनी सजले आहे. शहरवासीयांचे ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात कित्येक वर्षांपासून श्रावण महिन्यात फुलांची आरास केल्या जाते. यंदाही रंगबिरंगी फुलांनी मंदीर प्रवेश द्वार, सभामंडप आणि गर्भगृह आकर्षक पद्धतीने सजवून शिवलिंगाचा अनुपम शृंगार करण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. दिवस रात्र शिवभक्तीचा गजर येथे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *