मूर्तिजापूरात तिळ्या मुलींना दिला जन्म

सुमित सोनोने, बातमीपत्र, मूर्तिजापूर

निसर्गात सतत काहीना काही नवे चमत्कार घडत असतात.ते बघून आपणही आश्यर्च चकित होत असतो.आता तुम्ही याला चमत्कार म्हणा की आणखी काही परंतु मूर्तिजापूर येथे एका महिलेने एक,दोन नव्हे तर तीन मुलींना जन्म दिला आहे.

परंतू प्रकृती गंभीर झालेल्या तीनही मुलींवर येथील डॉ.बाबन राठोड हॉस्पिटल या खासगी रुग्णलयात तातडीने उपचार मिळाल्याने तीनही मुलींची प्रकृती ठणठणीत आहे.मूर्तिजापूरला माहेर असलेल्या प्रतिक्षा निलेश बोगडे (सासर चिचंखेड जि.अमरावती) यांची प्रस्तुती २९ जुलै २०२३ रोजी मूर्तिजापूरच्या डॉ.विक्रम शर्मा यांच्या रुग्णालयात झाली.त्यांनी तिळ्या गोंडस मुलींना जन्म दिला.परंतु जन्मानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली.यामुळे या तीनही मुलींना तातडीने मूर्तिजापूर येथीलच बबन राठोड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.त्यांना आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आवश्कतेनुसार ऑक्सिजन व्हेटिलेटर लावण्यात आले.२५ दिवसांच्या उपचारानंतर सद्या तिळ्या मुलींची प्रकृती बरी असून,रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.या तिळ्या मुलींवर आयुष्यमान जनआरोग्य मिळालेल्या निधीतून खर्च करण्यात आला. तीनही मुलींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉ. बाबन राठोड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *