अमरावती विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळा, माजी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजन

अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात , याकरिता संत गाडगेबाबा अमरावती माजी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ डेव्हलोपमेंट इंटरप्रेनुरिअल माईंडसेट अर्थात उद्योजकीय मानसिकता विकसित करणे या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . या कार्यशाळेमध्ये उद्योजकीय मानसिकतां विकसित करणे, व्यवसाय संदर्भातील नवकल्पना निर्मिती व व्यवसायाच्या नवनवीन संधीची ओळख करून देणे , स्टार्ट -अप नवीन कल्पना विकसित करून त्याचे पालन पोषणासह साहाय्य करणे , बँक आणि शासनाकडून उद्योगांकरिता वित्त पुरवठ्याची माहिती सांगणे व ब्रॅंडिंग आणि मार्केटिंग विकसित करून ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करणे अशा अनेक मुद्द्यावर तज्ज्ञ मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले . कार्यशाळेच्या उदघाटन सत्राला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ . प्रसाद वाडेगावकर , जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीचे माजी महाव्यवस्थापक उदय पुरी , इसीइ इंडिया एनर्जीज प्रा. लिमिटेड चे संचालक अमित अरोकर , विद्यार्थी विकास संचालक डॉ . राजीव बोरकर , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्रा . दीपाली मालखेडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *