NANDURBAR | शहादा शहरात धार्मिक तणाव, दोन गटात दगडफेक; मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

शहादा शहरातील साळी गल्ली, कुकडेल भागात ईद-ए-मिलाद च्या रॅलीमध्ये दोन गटात वाद होऊन धार्मिक तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हा वाद मिटवला होता तरी देखील दुपारनंतर एक गट आक्रमक झाला त्यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले यामुळे शहरातील साळी गल्ली, कुकडेल भागात दगडफेकीची घटना घडली असून या दगडफेकीत पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी शहादा शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *