भातकुली तालुक्यातील कोलटेक गावात रानटी डुकरांचा हौदोस

प्रतिनिधी धनराज खर्चान, भातकूली

भातकुली तालुक्यातील कोलटेक गावालगत १७ नोव्हेंबर रोजी भीमराव रावटळे यांच्या शेतात रानटी मादी डूकराणे मोठ्या प्रमाणात हौदोस घालून कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.आधीच कमी पाऊस अभावी कपाशी हे पीक करपून सुकून्याच्या मार्गावर आहे. रानटी डुकरांचा हैदोसमुळे आणखी शेतकऱ्यांचा संकटात भर पडलेली आहे.या घटनेची माहिती मिळताच समाज सेवक नितिन कदम थेट अमरावती शहरातून घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण वास्तविक परिस्थितीचा आढावा घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भीमराव रावटळे यांच्या शेतात झालेल्या नुकसान संबधित माहिती दिली. अधिकाऱ्यांनीही सकारत्मक प्रतिसाद देत लवकरच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानभरपाई जाहीर करण्याचे आश्वासन दिले व आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी वन विभाग व तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.यावेळी प्रत्यक्ष समाज सेवक नितिन कदम हे सुद्धा उपस्थित होते तसेच संदीप कोलटेंके, भोजराज कोलटेके, गजानन कोलटेके, श्रीराम कोलटेके, निवृत्ती कोलटेके, राजू रावतळे,गणेश डगवाळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *