यवतमाळ | डॉ. संजीव जोशी यांची राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणी मध्ये निवड

यवतमाळ वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा

श्रीकांत खोब्रागडे, प्रतिनिधी, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भारतीय बालरोग तज्ञ संघटना यांच्या केंद्रीय कार्यकारणी मध्ये यवतमाळतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संजय जोशी यांची २०२४ कार्यकारी मंडळात नियुक्ती झालेली आहे. ही नियुक्ती निवडणुकी द्वारे केली जाते अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर जोशी सरांनी भरघोस मतांनी विजय विजय मिळवून यवतमाळ चे नाव राष्ट्रीय पटलावर चमकवलेले आहे. या पदावर निवडून येणारे यवतमाळच्या इतिहासात ते पहिले व्यक्ती असून यवतमाळ शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरवर्षी केंद्रीय कार्यकारणी वर महाराष्ट्रामध्ये सात लोकांची निवड केली जाते अतिशय प्रतिष्ठेची अशी समजली जाणारी ही निवडणूक असून यवतमाळ सारख्या छोट्या शहरातून येणारा व्यक्ती जेथे संपूर्ण जिल्ह्यात फक्त ५० बालरोग तज्ञांचे पाठबळ आहे त्याने एवढ्या मोठ्या निवडणुकीत जिंकणं हे जवळपास अशक्यप्राय आहे परंतु यामागे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील बालरोग तज्ञांनी जोशी सरांना मदत करून त्यांचा प्रचार करून आपले योगदान दिले त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना २०१० इतकी मते मिळाली आणी हे यश प्राप्त होऊ शकले.

डॉ. जोशींसोबतच नाशिकचे डॉ. अमोल पवार, पुण्याचे डॉ. प्रमोद कुलकर्णी, मुंबईच्या डॉ. बेला वर्मा, ठाण्याचे डॉ. जितेंद्र गव्हाणे, छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. रेणू बोराळकर तसेच सांगली येथील डॉ. विनायक पत्की यांची सुद्धा केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झालेली आहे. या सोबतच विदर्भासाठी सुद्धा एक गर्वाची बाब घडलेली असून नागपूरचे डॉक्टर वसंत खळतकर यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.

डॉक्टर संजीव जोशी हे मागील तीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ह्या क्षेत्रात त्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव योगदान आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस मध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांचा सहभाग असतो तसेच राष्ट्रीय बाल मेंदू रोग तज्ञ या संघटनेचे सुद्धा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. विदर्भ बालरोगतज्ञ संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. त्यांनी मागील 30 वर्षात घेतलेल्या मेहनतीला ही यशाची एक पावती मिळाली असून ह्याचे संपूर्ण श्रेय ते यवतमाळ बालरोग तज्ञ संघटनेच्या टीमला देतात ज्यांनी मागील चार सहा महिने या निवडणूकीकरिता खूप मेहनत घेतली त्यामुळेच हे शक्य होऊ शकले . विशेषतः यवतमाळ बालरोग संघटनेच्या महिला आघाडीने सुद्धा अतिशय मेहनत् घेऊन ह्या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली असून त्यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व बालरोग तज्ञांनी दाखवलेला विश्वासामुळेच राष्ट्रीय स्तरावर माझी नियुक्ती होऊ शकली त्याकरिता मी संपूर्ण महाराष्ट्रातील बालरोग तज्ञांना धन्यवाद देतो तसेच आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरण्याचा प्रयत्न करेल तसेंच राष्ट्रीय स्तरावर राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या योजना तसेच वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस यांचा महाराष्ट्रासाठी कसा फायदा होईल याचे मी प्रयत्न करणार असून तळागाळातील बालरोग तज्ञांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळावं त्यांची ओळख राष्ट्रीय पातळीवर व्हावी आणि तळागाळात विशेषता तालुकास्तरावर सुद्धा केंद्रीय बालरोग तज्ञ संघटनेची पोहोच असावी तिथेही काही उपक्रम राबविल्या जावे आणी त्यांना सुद्धा मुख्य धारेत आणण्यासाठी मी प्रयत्न करत राहील असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *