दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्यावर भर – आमदार सौ. सुलभाताई खोडके

मुजफ्फर अहेमद मामू मेमोरियल हॉकी चॅम्पियन ट्रॉफीचा शुभारंभ

पॅराडाईस अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने स्थानिक पॅराडाईस कॉलनी स्थित निदा मैदान ( डॉ. एपीजे अब्दुल कलाम मैदान ) येथे मुजफ्फर अहेमद मामू मेमोरियल हॉकी चॅम्पियन ट्रॉफी २०२३ चा शानदार शुभारंभ करण्यात आला . या स्पर्धेला आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी भेट दिली. यावेळी आयोजन समितीच्या वतीने आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. दरम्यान आमदार महोदयांनी या आयोजनाची प्रशंसा करीत महाराष्ट्राच्या कानाकोपल्यातून आलेल्या सर्व हॉकी खेळाडूंना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.

अमरावती शहरातील क्रीडा प्रबोधिनी , जिल्हा क्रीडा संकुल आदी ठिकाणी अद्यावत व दर्जेदार क्रीडा सुविधांची पूर्तता होत असतांना स्थानिक भागातील मैदाने विकसित करून त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण खेळांना प्रोत्साहित करण्यासाठी आपला पुढाकार राहणार असल्याचा विश्वास आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी हॉकीचे सामने रंगले असता मान्यवरांसह क्रीडा प्रेमींनी स्पर्धेचा आनंद घेतला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ता व विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, दैनिक अमरावती मंडळ ,मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, सना ठेकेदार, हाजी रफिक, ऍड . शब्बीर खान, साबीर पहेलवाल, गाजी जाहेरोश, अबरार साबीर , सय्यद साबीर, हबीब ठेकेदार, आदींसह क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *