यवतमाळ | संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ (प्रतिनिधी): संविधान दिनानिमित्य दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रबोधनाचा कार्यक्रम संविधान प्रचार व प्रसार संस्था प्रमुख पुरूषोत्तम भजगवरे यांचे वतीने दिनांक 25 नोव्हेंबर शनिवार 2023 रोजी दु. 12:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन संविधान चौक, यवतमाळ येथे आयोजित केलेला आहे.

या संविधान प्रबोधन कार्यक्रमात संविधानाचे अभ्यासक प्रबोधन करणार आहे. भारतीय संविधान हे देशाच्या प्रत्येक नागरीकाचे आहे. भारताच्या प्रत्येक नागरीकांना संविधानाने मुलभूत अधिकार दिलेले आहे. हया मुलभूत अधिकारात देशाच्या प्रत्येक नागरीकाचे सार्वोभौमिक हित जोपासलेले आहे. म्हणुनच देशाच्या प्रत्येक नागरीकाने संविधान वाचने व समजुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. दैनदिन जिवनात जे कायदेयाचे नियम आहे. ते भारतीय संविधानाचीच देण आहे. म्हणुनच होणा-या संविधानावर प्रबोधनाच्या कार्यक्रमात भारतीय नागरीकाने अवश्य उपस्थित रहावे. असे आयोजन समितीचे सदस्य श्रीकांत खोब्रागडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे सुचित केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *