विद्यापीठात ‘भारतीय संविधान आणि आंबेडकरी सौंदर्यशास्त्र’ विषयावर 30 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे आयोजन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने स्व. श्री गोविंदजी खोब्राागडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यापीठास प्राप्त दाननिधीमधून 30 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 3.30 वा. विद्यापीठ परिसरातील डॉ. पंजाबराव उपाख्य़ भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह येथे ‘भारतीय संविधान आणि आंबेडकरी सौंदर्यशास्त्र’ या विषयावर व्याख्यानमालेचे आय़ोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे व्याख्यान देणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, माजी उच्चशिक्षण सहसंचालक व दानदाते डॉ. बी.जी. खोब्राागडे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *