शैव गुरव हितकारिणी मंडळाच्या कार्यालयात आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण

गुरव समाज भवन बुधवारा येथे वसतीगृह बांधण्यासाठी निधी देणार – आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती २८ जानेवारी : कुठल्याही समाजची जडण घडण ही त्या समाजातील संघटनात्मक बांधणी व समाजोपयोगी अभिनव अशा उपक्रमातून होत असते. शैव गुरव समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैव गुरव हितकारिणी मंडळाचे कार्य अतुलनीय असून पुढील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी आपण कटीबद्द आहोत, शैक्षणिक हित व विकास लक्षात घेता गुरव समाज भवनावर दुसरा मजला बांधकामा करीता १५ लक्ष रुपयांचा निधी देऊन मुलांचे वसतीगृह बांधून देणार असल्याची घोषणा अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केली. २६ जानेवारी २०२४ रोजी गणराज्य दिनानिमित्य श्री शैवगुरव हितकारिणी मंडळ च्या गुरव समाज भवन बुधवारा अमरावती येथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगान करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

पुढे बोलतांना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्वांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतांना सांगितले की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्षात आज देशाने प्रगतीकडे वाटचाल केली असून संविधानाने बहाल केलेल्या लोकशाही मूल्यांमुळे आज देशात स्वातंत्र, समता व बंधुत्व नांदत आहे. शैव गुरव समाजाचे सुद्धा सामाजिक समता प्रस्थापित करण्यात मोठे योगदान असून समाजाच्या विविध उपक्रमांतून याचा वेळोवेळी प्रत्यय घडला आहे. शैव गुरव समाजाच्या भावी वाटचालीमध्ये अनेक विकासात्मक बाबींची भर पडली, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास सुद्धा आमदार महोदयांनी व्यक्त केला.

आमदार महोदयांच्या या उदबोधनावर सर्व समाजबांधवांनी मोठ्या आनंदाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. तसेच जेष्ठ पत्रकार त्रिदीप वानखडे यांनी प्रथमच बुधवारा येथील गुरव समाजाला निधी उपलब्ध करून देणाऱ्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे आभार मानून याची परतफेड आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहून करण्यास असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ता व विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना मंडळाच्या उपक्रमांची प्रशंसा केली. समाजातील बुद्धिजीवी वर्गामुळे मंडळाला विचारांची नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले.

दरम्यान शैव गुरव समाज मंडळाच्या युवा आघाडीतील अध्यक्ष भूषण पुसदकर यांचे मनपा च्या पतसंस्थेवर निवडून आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शरदराव देवरणकर, सचिव दिलीपराव बेलबागकर,बांधकाम समितीचे अध्यक्ष अशोकराव कुलकर्णी, ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव धानोरकर, बाळासाहेब पंढरपूरकर, गोपालराव चिखलकर, गोविंदराव रोहणकर, शरदराव पुसदकर, माजी अध्यक्ष मिलिंदजी कहाळे, दिनकरराव अंबुलकर, महिला आघाडीतील जिल्हा संघटक सौ दिपाताई बेलबागकर, अध्यक्षा सौ तृप्तीताई व्यवहारे, सौ सरोज, श्री दीपकराव पिंजरकर, राजेंद्र बाळापुरे युवा आघाडीतील अध्यक्ष भूषण पुसदकर, राहुल मोरे, राहुल खंडार, महेश कथलकर, सेवानिवृत्त अभियंता विलासराव जामठिकर, ॲड. सौ. हितेष्नी देवरणकर, श्रीकृष्णजी बाळापुरे, जयंतराव वानखडे, संतोष पांडे, सुशील कथलकर, सतिषराव पांडे, भारतीताई तायडे, बाळासाहेब वानखडे, प्रकाश कोहळे, राजेंद्रजी कुऱ्हेकर, सागर दलाल, संजय वानखडे, श्री दिलीपराव पैठणकर, वामनराव बाळापुरे, मुकुंदराव, पुसदकर, कृष्णराव चिखलकर, प्रविण शेंगोकार, नारायणराव विटकरे, संतोष चिखलकर, प्रमोदराव वाठोडकर सदानंद तायडे, राजेंद्र तायडे, बाबू बोराटने, सौ चंदाताई तायडे, सौ कुंदा पुसदकर, सौ नलिनीताई चिखलकर उपाध्यक्षा, निशा कोहळे, वैशाली आरोकर, बाळ वानखडे, सुशिल कथळकर, डॉ राजेंद्र बाळापुरे व महेश कथलकर, तसेच प्रकाश कोहळे, श्री जयंतराव वानखडे व बरेच मंडळाचे आजी – माजी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *