१० वर्षाच्या दिव्यांग क्षितीजाला जिवन आधारने दिला आधार, देव दगडात नाही तर माणसात आहे;

चांदूरबाजार | देव दगडात नाही बापहो माणसात आहे!या गाडगे बाबांच्या संदेशाचा प्रत्यय वरुडच्या क्षिथीजा गरीब कुटुंबाला आला.घरी अठराविश्वे दारीद्र्य,पिता अपंग असतांना त्यांच्या १० वर्षाच्या जन्मत: उलटा पाय असल्याने तिलाही चालता व उभेराहताही येत नव्हते.अनेक डाॅक्टरांना दाखविले परंतु शस्त्रक्रियेसाठी लागणाली लाखोची रक्कम आणणार कोठून असा प्रश्न माता,पित्या समोर उभा ठाकला.अशातच तिला महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून जिवन आधारचा आधार मिळाला.

वरूड येथील १० वर्षाची लहानशी चिमुकली कु शितिजा सुरेंद्र शेरेकर ही आपल्या जीवन आधार सामाजिक संस्थेने घेतलेल्या महाआरोग्य शिबिरात तिच्या माता,पिता आणि आजी सोबत तपासणीसाठी दाखल झाली.ती जिवन आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जिवन जवंजाळ यांना भेटली. क्षितीजाचा पाय हा पूर्णतः उलटा होता तिला चालता पण येत नव्हते तिचे पिता सुद्धा पायांनी अपंग आहे. त्यांनी जिवनराव यांना आपली व्यथा सांगीतली.आपल्या मुलीला चालता यावे यासाठी पित्यांची धडपळ त्यांचे अश्रु आवरु शकले नाही.जिवनराव यांनी त्यांना धीर दिला व आपण तिला नक्कीच पायावर उभी करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

शिबीरात प्राथमिक तपासणी केल्यानंतर जिवन आधारच्या रुग्णवाहिकेत क्षितीजाला नागपूरला नेण्यात आले.तेथे तिला शालिनी ताई मेघे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. हॉस्पिटल मध्ये शितिजाच्या पायाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. शालिनी ताई मेघे हॉस्पिटल मधील कार्यरत आर्थो सर्जन (सीएमएस) डाॅ. वसंत गावंडे यांनी शितिजा साठी मुंबई वरून तज्ञ डॉक्टरांची टीम बोलवली व शितिजाच्या पायावर शस्त्र क्रिया केली.शस्त्रक्रीया यशस्वी झाली.यात शालीनीताई हाॅस्पीटलचे संचालक सागर मेघे,समिर मेघे,सीएमएस डाॅ.अनुप मरार, डाॅ.वसंत गावंडे,प्रशासकीय अधिकारी अश्विन रडके,अजय ठाकरे सह वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शितिजा ही गेल्या तिन महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतरचे उपचार घेत आहे.यासाठी क्षितीजाच्या माता,पित्यांना एक पैसाही खर्च करावा लागला नाही हे विशेष! क्षितीजाच्या पित्याला बऱ्याचशा डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन खूप खर्चिक असून चालू शकणार की नाही अशी शंका व्यक्त केल्याचे तिचे पिता सांगतात.आज तीच चिमुकली शितिजा चालायला लागली याचा आनंद तिच्या कुटुंबियांनी आपल्या आनंदाश्रुंनी जिवनरावां समोर व्यक्त केला.

  • समाजात अनेक अशा शितिजा सारखे मुली आणि मुले आहेत जे बिचारे पैशाच्या अभावी उपचारावीना दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत म्हणूनच आपण जीवन आधार सामाजिक संस्थेचा माध्यमातून आरोग्याची चळवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सुरु केलेली आहे.
    जिवन जवंजाळ,अध्यक्ष जिवन आधार सामाजिक संस्था.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *