अमरावती महापालिका आयुक्तांनी सादर केला 925.71 कोटींचा अर्थसंकल्प

अमरावती महानगर पालिकेचा सन २०२४-२५ च्या 925.71 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज महापालिका प्रशासक देविदास पवार यांनी सादर केला.हा अर्थ संकल्प सादर करतांना
आर्थिक स्त्रोतांचा तसेच महानगरपालिकेकडून अमरावतीकर नागरिकांच्या असलेल्या अपेक्षांचा योग्य तो ताळमेळ घालून, अमरावती शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषण मुक्त होऊन महानगरपालिकेतर्फे सेवा दर्जेदार, वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या आशावादी दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अमरावतीकर नागरिकांसाठी समर्पित करीत असल्याचे महापालिका आयुक्त यावेळी म्हणालेत.

अमरावती शहराचा समतोल विकासासोबतच ज्या सुविधांमध्ये कमतरता आहे अशा सुविधाचे बळकटीकरण करण्यासाठी महापालिका भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न करीत आहे. अमरावती शहरातील बगीचा विकास, ग्रीन जिमची सुविधा उपलब्ध करून देणे, खेळणी उपलब्ध करून देणे, बगीच्यांचे नूतनीकरण करणे, शहर प्रदूषण मुक्त करणे, शहरातील रस्ते विकास, चौक विकास, क्रीडा साहित्य उपलब्ध करणे, क्रीडांगणांचा विकास, झोपडपट्टी विकास, ऐतिहासिक वारसा असलेल्या परकोटाचे सौंदर्याकरण, अग्निशामक बळकटीकरण, नवीन अग्निशामक केंद्र तयार करणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन आयोगाच्या थकबाकी देणे, इ. साठी भरीव तरतुदी अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेल्या आहेत.

सन २०२४-२५ या वर्षात महानगरपालिकेची प्रारंभिक शिल्लक रु.१४४.१० कोटी या मध्ये महसूली शिल्लक रु. २३.५५ कोटी, भांडवली शिल्लक रु.१०२.१६ कोटी, असाधारण ऋण व निलंबन शिल्लक रु. १८.३९ कोटीचा समावेश आहे. व सर्व बाजूने मिळणारे महसूली उत्पन्न रु.४७२.४९ कोटी, भांडवली उत्पन्न रु. ४३८.४२ कोटी, असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न रु. १४.८० कोटी चा समावेश आहे. असे एकूण रु. ९२५.७१ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित केलेले आहे. परंतु भांडवली खर्चा करीता प्रारंभिक शिल्लक रु.१०२.१६ कोटी व भांडवली उत्पन्न रु.४३८.४२ कोटी असे एकूण रु.५४०.५८ कोटी प्राप्त निधीचा विनियोग शासनाने घालुन दिलेल्या अटी व शर्तीनुसार करावा लागतो, त्यामुळे मनपा कडील प्रारंभिक महसुली शिल्लक रु. २३.५५ कोटी व मनपा चे एकूण महसुली उत्पन्न रु. ४७२.४९ कोटी असे एकूण रु.४९६.०५ कोटी एवढे महसूली उत्पन्न असुन यामधुनच मनपा ला थकित व आवश्यक खर्चाची कामे करावी लागणार आहेत.

सन २०२४-२५ करीता एकूण खर्च ९४७.९६ कोटी इतका अपेक्षित आहे, यामध्ये महसूली खर्च रु.४९५.२७ कोटी, भांडवली खर्च रु.४३७.८९ कोटी व असाधारण ऋण व निलंबन खर्च रु. १४.८० कोटीचा समावेश आहे. वर्षाअखेर महसूली अखेरची शिल्लक रु. ०.७८ कोटी, मांड़वली अखेरची शिल्लक रु. १०२.६९ कोटी, व असाधारण ऋण व निलंबन अखेरची शिल्लक रु. १८.३९ कोटी, अशाप्रकारे एकूण रु. १२१.८६ कोटी शिल्लक राहील. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात नविन मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्यामुळे महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येवुन तसेच महसुली उत्पनाचे इतर स्रोत सुद्धा शोधण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *